Advertisement

१५ ते १८ वयोगटातील मुलांचे 'या' तारखेपासून लसीकरण

पंतप्रधानांच्या घोषणेपूर्वीच, DCGI नं लहान मुलांच्या लसीसाठी कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे.

१५ ते १८ वयोगटातील मुलांचे 'या' तारखेपासून लसीकरण
SHARES

३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस लागू करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. लवकरच देशात अनुनासिक आणि डीएनए लसही सुरू करण्यात येणार असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं. पंतप्रधानांच्या संबोधनापूर्वी, DCGI नं लहान मुलांच्या लसीसाठी कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे.

'ओमायक्रॉन जगभरात पसरत आहे. आपले भारतीय संशोधक त्यावर नजर ठेवून आले. आतापर्यंत आपल्याकडे १८ वर्षांपर्यंतच्या व्यक्तीला लस घेण्यास परवानगी होती. पण, आता यापुढे १५ वर्षांपासून मुलांना लस घेता येणरा आहे. पुढील महिन्यात ३ तारखेपासून लसीकरण सुरू होणार आहे, अशी घोषणाही पंतप्रधानांनी केली.

'देशात कोरोनाचे संकट आले पण अजून हे संकट टळले नाही. त्याला रोखण्यासाठी आपण लसीकरण सुरू केले. मागील वर्षी १६ जानेवारीपासून आपण नागरिकांना लसीकरण सुरू केले होते. देशातील नागरिकांनी या अभियानाला साथ दिली. त्यामुळे भारतात १४१ कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे अभूतपूर्व आणि अवघड असे लक्ष पार केले, अजूनही देशभरात लसीकरण वेगानं सुरू आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

'देशात लवकरच नाकाने लस देण्याची पद्धत सुरू होणार आहे. याचे काम सुरू आहे. गेल्या १२ महिन्यांपासून देशात लसीकरण अभियान सुरू आहे. सर्वसामान्याचं आयुष्य आता सुरळीत होत आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारली आहे. पण, कोरोना अजून गेला नाही. देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला सतत काम करायचे आहे, असं आवाहनही मोदींनी केलं.

यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधून कोरोनाच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. यावेळी पंतप्रधानांनी १० जानेवारीपासून आरोग्य सेवक, डॉक्टर्स तसंच फ्रंट लाइनर्स यांना बूस्टर डोस देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.हेही वाचा

...नाहीतर पुन्हा लॉकडाऊन लावणार, राजेश टोपे यांचे मोठे विधान

भारतात 'या' तारखेपासून देणार बूस्टर डोस, पंतप्रधान नरेंद्र मोदीची घोषणा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा