जेजे हॉस्पिटलमधील १८ टक्के व्हेंटिलेटर्स निकामी; हॉस्पिटलची मानवी हक्क आयोगाला माहिती

हॉस्पिटलमधील एकूण व्हेंटिलेटर्सपैकी डझनभर व्हेंटिलेटर्स दुरुस्तीसाठी देण्यात आले आहेत. व्हेंटिलेटर्सचे काही सुटे भाग हरवल्याचंही हॉस्पिटलने सांगितलं आहे. एका जपानी कंपनीने २००४ मध्ये काही व्हेंटिलेटर्स जेजे हॉस्पिटलला दिले होते. यामधीलही काही व्हेंटिलेटर्स निकामी झाले आहेत.

SHARE

मुंबईतील प्रसिद्ध जेजे हॉस्पिटलमध्ये देशभरातून रोज शेकडो रूग्ण उपचारासाठी येत असतात. चांगले आणि स्वस्त उपचारामुळे गरीब रूग्ण जेजेमध्ये येतात. मात्र, जेजे हाॅस्पिटलचा भोंगळ कारभार आता उघडकीस आला आहे. हाॅस्पिटलमध्ये १८ टक्के व्हेंटिलेटर्स निकामी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खुद्द हॉस्पिटलनेच राज्य मानवी हक्क आयोगाला ही माहिती दिली आहे. जेजे हॉस्पिटलमध्ये १३५० खाटा आहेत. तर हॉस्पिटलकडे  ८३ व्हेंटिलेटर्स आहेत. मात्र, यामधील १५ व्हेंटिलेटर्स निकामी किंवा दुरूस्तीसाठी देण्यात आले आहेत. 


सुटे भाग हरवले

हॉस्पिटलमधील एकूण व्हेंटिलेटर्सपैकी डझनभर व्हेंटिलेटर्स दुरुस्तीसाठी देण्यात आले आहेत. व्हेंटिलेटर्सचे काही सुटे भाग हरवल्याचंही हॉस्पिटलने सांगितलं आहे.  एका जपानी कंपनीने २००४ मध्ये काही व्हेंटिलेटर्स जेजे हॉस्पिटलला दिले होते. यामधीलही काही व्हेंटिलेटर्स निकामी झाले आहेत. धक्कादायक म्हणजे निकामी व्हेंटिलेटर्सपैकी ४ व्हेंटिलेटर्स आयसीयूमधील तर ६ व्हेंटिलेटर्स अतिदक्षता विभागातील आहेत. ऐनवेळी व्हेंटिलेटर्स उपलब्ध न झाल्यास एखाद्या रुग्णाला आपले प्राणही गमवावे लागू शकतात. 


व्हेंटिलेटरचा तुटवडा

मुंबईतील अनेक हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरचा तुटवडा असल्याचं दिसून येते. तर बऱ्याच  हॉस्पिटलमधील व्हेंटिलेटर निकामी असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी दिली आहे. मुंबईतील हॉस्पिटलमध्ये पुरेसे आयसीयू बेड आहेत का, ते चांगल्या स्थितीत आहेत का याची माहिती कोठारी यांनी मागवली होती. त्यामध्ये ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. याबाबतची सुनावणी राज्य मानवी हक्क आयोगापुढे सुरू आहे.हेही वाचा -

मुंबईच्या 'या' भागात २८, २९ एप्रिलला पाणीपुरवठा

महिला मतदारांसाठी मतदान केंद्रावर सॅनेटरी पॅडची सुविधा
संबंधित विषय
ताज्या बातम्या