Advertisement

मुंबईत कोरोना रुग्णांना बेडस् उपलब्ध करण्यासाठी विशेष वॉर्ड निहाय वॉर रुम

कोरोना रुग्णांच्या अडचणी दूर करत त्यांना वेळेत उपचार मिळावे यासाठी पालिका आयुक्त चहल यांनी विभाग कार्यालयात वॉर रुम स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबईत कोरोना रुग्णांना बेडस् उपलब्ध करण्यासाठी विशेष वॉर्ड निहाय वॉर रुम
SHARES

कोरोना रुग्णांना योग्य उपचार मिळणे, रुग्णवाहिका उपलब्ध करणे अशा सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी आता पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे. यासाठी 24 विभाग कार्यालयात वॉर रुम स्थापन केली जाणार आहे.

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत एक हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात आला होता. कोरोना रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी सुरु केलेल्या मुख्य नियंत्रण कक्षातील 1916 या हेल्पलाईनबाबत अनेक तक्रारी येत होत्या. ही रुग्णसंख्या वाढल्यानं या क्रमांकावरचा ताणही वाढला होता. यावर उपाय म्हणून तातडीने आणि विकेंद्रीत पद्धतीने बेड्स उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच वॉर्ड वॉर रुम सुरु करण्यात येणार आहे.

कोरोना रुग्णांच्या अडचणी दूर करत त्यांना वेळेत उपचार मिळावे यासाठी पालिका आयुक्त चहल यांनी विभाग कार्यालयात वॉर रुम स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ही वॉर्ड वॉर रुम सुरु केल्यानंतर त्यांचे संपर्क क्रमांक प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे आणि इतर संपर्काच्या माध्यमांतून मुंबईकरांपर्यंत देण्यात येणार आहेत.

रोज सकाळी 8 वाजता साथ नियंत्रण विभागाकडून या वॉर रूमला पॉझिटिव्ह रुग्णांची यादी ऑनलाईन दिली जाईल. ही यादी मिळताच वॉर रूममधील डॉक्टरांकडून पॉझिटिव्ह रुग्णांना लक्षणे आहेत की नाहीत, याची माहिती घेऊन ते ज्या विभागात राहतात त्याची माहिती घेऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे, केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन करावे की घरातच क्वारंटाईन करावे यावर निर्णय घेतला जाणार आहे.

 मुंबई महापालिका आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकानुसार, विभाग कार्यालयातील डिजास्टर कंट्रोल रूम वॉर्ड वार रूम म्हणून जाहीर करण्यात आला आहे. विभाग कार्यालयात असलेल्या डिजास्टर कंट्रोल रूममध्ये  फोनच्या 30 लाईन असाव्यात. या कंट्रोल रूमचे प्रमुख सहाय्यक आयुक्त असतील. हा कंट्रोल रूम वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या देखरेखीखाली असेल. तसेच महाराष्ट्र राज्याच्या मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चकडून डॉक्टरांची नियुक्ती केली जावी, असे निर्देश दिले आहेत.

सहाय्यक आयुक्तांनी 8  जनरल आणि दोन 108 च्या रुग्णवाहिका तैनात कराव्यात असेही म्हटले आहे. विभागातील रुग्णालयातील रिक्त असलेल्या खाटांची माहिती सहाय्यक आयुक्तांनी रोज वेब पोर्टलवर टाकावी. यात कोणत्याही प्रकारची हलगर्जी करू नये असे परिपत्रकात म्हटले आहे.


हेही वाचा -

महापालिका, डॉक्टर, नर्स यांच्या प्रयत्नांनंतर धारावीतील रुग्णवाढीचा वेग मंदावला

मुंबईत पावसाच्या हलक्या सरी, तापमानातही घट




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा