Advertisement

वाडियामध्ये जागतिक किडनी दिन साजरा


वाडियामध्ये जागतिक किडनी दिन साजरा
SHARES

परळ - जागतिक किडनी दिनानिमित्त परळ पूर्व येथील बाई जेरीबाई वाडिया रुग्णालयात शैक्षणिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. यात किडनीच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या 100 हून अधिक मुलांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश 'निरोगी किडनीसाठी निरोगी जीवन' असा असून, ज्यांना अवयव दान करण्याची इच्छा आहे अशा नागरिकांनी पुढे यावे यासाठी जनजागृती करणे असा होता.

गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने वाडिया रुग्णालयात जागतिक किडनी दिनानिमित्त जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाही रुग्णालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात 'निरोगी किडनीसाठी निरोगी जीवन' कसे जगावे यासाठी कशा पद्धतीचा आहार रोजच्या जेवणात असणे गरजेचे असून, त्याचे फायदे आपल्या शरीराला कसे उपयुक्त ठरू शकतात याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मुलांचा उत्साह वाढावा यासाठी चित्रकला स्पर्धा आणि विविध खेळांचे आयोजन देखील करण्यात आले होते. त्याचबरोबर बेस्टच्या एका डबल डेकर बस मधून कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना परळ येथील रुग्णालयापासून सीएसटी दरम्यान फिरविण्यात आले.


तर सध्याची कामकाजाची पद्धत बदलली आहे. अनेक लोक तासनतास एका जागेवर बसून, काम करतात यामुळे लठ्ठपणा वाटतो हा लठ्ठपणा किडनी आजाराचे मुख्य कारण असले तरी किडनी आजाराची वेगवेगळी लक्षण दिसून आली आहेत. त्यामुळे वेळेत औषधोपचार घेणे गरजेचे असल्याचे वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवा यांनी सांगितलं. यावेळी डॉ. अश्विनी जोगाडिया, रुग्णालयातील कर्मचारी रुग्णांचे पालक उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा