Advertisement

Mumbai Fire Update: मुंबईत उभारली जाणार 2 नवीन अग्निशमन केंद्रे

मुंबई अग्निशमन दलाने (MFB) नुकतीच शहराच्या पूर्व उपनगरात दोन अग्निशमन केंद्रे बांधण्याची घोषणा केली आहे.

Mumbai Fire Update: मुंबईत उभारली जाणार 2 नवीन अग्निशमन केंद्रे
SHARES

मुंबई अग्निशमन दलाने (MFB) नुकतीच शहराच्या पूर्व उपनगरात दोन अग्निशमन केंद्रे बांधण्याची घोषणा केली आहे. माहितीनुसार, एक अग्निशमन केंद्र कांजूरमार्ग इथे तर दुसरे घाटकोपर इथे इभारण्यात येईल.

अधिक माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुख्य अग्निशमन केंद्र कांजूरमार्ग येथे उभारले जाईल, तर घाटकोपर येथे मिनी फायर स्टेशन उभारले जाईल. सध्या, कांजूरमार्गमध्ये एक मिनी स्टेशन आहे, ज्यामध्ये सुधारणा करून मुख्य अग्निशमन केंद्रात पुनर्बांधणी केली जाईल.

मुंबई अग्निशमन दलाने घाटकोपर परिसरातील दाट लोकवस्ती असलेलल्या कामराज नगर इथे नवीन मिनी फायर स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. दरम्यान, कांजूरगाव येथील तीन हजार चौरस मीटर जागेवर नवीन अग्निशमन केंद्र बांधण्यात येणार आहे.

जवळील अग्निशमन केंद्राची कमतरता लक्षात घेऊन कांजूरमार्ग आणि घाटकोपर येथे दोन अग्निशमन केंद्र बांधणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपग्रेड केलेल्या कांजूरमार्ग स्थानकात कवायती करण्यासाठी टॉवरसह दोन प्रशासकीय इमारती असतील. इंधन आणि लॉजिस्टिक्ससाठी स्टोरेज सेंटर तसेच अग्निशमन दलाच्या जवानांसाठी निवासी सुविधा देखील असेल.

नवीन अग्निशमन केंद्र 15 कोटी रुपयांना बांधले जाणार असून त्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. हे अग्निशमन केंद्र 2024 पर्यंत पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

घाटकोपर (पूर्व) येथे 17 डिसेंबर रोजी लागलेल्या आगीच्या घटनेत 1 जण ठार तर 12 जण जखमी झाले होते. विक्रोळी येथून अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आणि अधिकाऱ्यांनी सांगितले की, अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी सुमारे 30 मिनिटे लागली.

सध्या विक्रोळी आणि मुलुंड दरम्यान एकच मुख्य अग्निशमन केंद्र असून पूर्व उपनगरात विद्याविहार आणि सायनमधील प्रत्येकी एक अग्निशमन केंद्रे आहेत.हेही वाचा

कांदिवली, मीरा रोड स्थानकांचा होणार कायापालट, पश्चिम रेल्वेची 'ही' आहे योजना

मुंबई, दादरसह 'या' रेल्वे स्थानकांचा होणार मेकओव्हर

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा