Advertisement

दहिसरमधील रुस्तमजी शाळेतील २५ वर्गांचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर

वाढती रुग्ण संख्या पाहून दहिसरमधील रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलनं २५ वर्गखोल्यांना नवीन कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतरित केले आहे.

दहिसरमधील रुस्तमजी शाळेतील २५ वर्गांचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर
SHARES

कोविड -१९ चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सरकार तर्फे करण्यात येणाऱ्या सुविधा देखील अपुऱ्या पडू लागल्या आहेत. रूग्णांना बेड आणि ऑक्सिजन पुरवठ्याचा तुटवडा जाणवत आहे. याशिवाय कोविड सेंटर देखील रुग्णांनी भरले आहेत.

वाढती रुग्ण संख्या पाहून दहिसरमधील रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूलनं २५ वर्गखोल्यांना नवीन कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतरित केले आहे. वृत्तानुसार, या प्रत्येक वर्गात सहा बेडचं रूपांतरण झालं आहे. हे केंद्र लवकरच रूग्णांच्या सर्व सुविधांसह सुरू होणार आहे.

दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कोरोनाव्हायरस रूग्णांच्या बेडची कमतरता टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

राज्य सरकारच्या अनेक एजन्सी जंबो कोविड सेंटर सुरू करण्याच्या तयारीत आहेत. परंतु तीव्र कमतरता दूर करण्यासाठी महापालिका येत्या दोन ते तीन दिवसांत २०० आयसीयू बेड्स जोडणार आहे. लसीकरणासाठी मुलुंड जंबो सेंटर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शिवाय, दुसर्‍या लॉकडाऊनच्या भीतीनं, कामगारांनी मुंबईतील धारावी इथं पीपीई किट बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये काम करणं थांबवलं आहे. श्रीवास्तव यांना त्याचा ड्रेस मटेरियल मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीत रूपांतर करावा लागला जो आता पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आणि डॉक्टरांसाठी पीपीई किट बनवतो.

महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, सुमारे ९० टक्के रुग्ण इमारतींमधील आहेत. तर झोपडपट्ट्यांमध्ये फक्त १० टक्के रुग्ण आहेत.

दरम्यान, राज्यात बुधवारी कोरोनाचे नवीन ६७ हजार ४६८ रुग्ण आढळले. तर ५६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ५४ हजार ९८५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आतापर्यंत ६१ हजार ९११ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५४ टक्के आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ३२ लाख ६८ हजार ४४९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (८१.१५ टक्के एवढे आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ४६ लाख १४ हजार ४८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४० लाख २७ हजार ८२७ (१६.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९,१५,२९२ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २८ हजार ३८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.हेही वाचा

“केंद्राला जी लस १५० रुपयांना ती राज्यांना ४०० रुपयांत का?”

घराजवळील कोव्हिड सेंटर कसं आणि कुठं शोधायचं? जाणून घ्या

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा