एमएमआरसीचा आरे वासियांना दे धक्का

  Mumbai
  एमएमआरसीचा आरे वासियांना दे धक्का
  मुंबई  -  

  मुंबई - आरे कारशेड आणि आरेमधील मेट्रो-3 च्या बांधकामाला विरोध करत पर्यावरणवादी संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाच्या निर्देशानुसार या जागेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास बंदी आहे, असे असताना आरेमध्ये काम सुरू करू पाहणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ला आरेतील गावकऱ्यांनी शनिवारी चांगलाच दणका देत काम बंद पाडत कंत्राटदाराला आल्या पावली परत पाठवले.

  आरे, 19 युनिट येथे मेट्रो-3 चे काम सुरू करण्यासाठी शनिवारी कंत्राटदाराकडून सॉईल टेस्टिंगच्या मशिन आणण्यात आल्याचे युनिट 19 मधील गावकऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे या गावकऱ्यांनी कंत्राटदाराकडे कामासाठी परवानगी आहे का याची विचारणा केली. कंत्राटदाराने परवानगीचा कागद दाखवला. पण, ही परवानगी जेव्हीएलआर येथील 3 हेक्टरच्या जागेसाठीची होती. ज्या ठिकाणी काम करण्यासाठी मशीन आणल्या होत्या ते ठिकाण ना विकास क्षेत्रात येत असताना आणि येथील मेट्रो-3 च्या बांधकामासंबंधीची याचिका न्यायालयात दाखल असताना हे काम कसे करता असा सवाल गावकऱ्यांनी कंत्राटदाराला करत काम बंद पाडले. तर गावकऱ्यांनी कंत्राटदाराविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली.

  काम करण्यास बंदी असताना अवैधरित्या काम करण्याचा प्रयत्न करत आहे, पण आम्ही कोणत्याही परिस्थितीत हे होऊ देणार नाही, असा इशारा वनशक्ती प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी दिला आहे. तर एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांशी याविषयी काहीच बोलणे झाले नाही.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.