शौचालयांची दुरवस्था

 Goregaon
शौचालयांची दुरवस्था

गोरेगाव - गोरेगावच्या पश्चिमेकडील हनुमाननगर इथल्या पुरुष आणि महिलांच्या शौचालयाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. या भागात पालिकेची २९ शौचालये आहेत. गेल्या ४ महिन्यांपासून या शौचालयाचे दरवाजे तुटलेले असून येथील वीजही गायब आहे. पालिका आणि स्थानिक नगरसेविकेला वारंवार पत्र लिहूनही समस्या मात्र सोडवल्या जात नाहीत, असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

Loading Comments