Advertisement

महारेराच्या अध्यक्षपदी अजोय मेहता

गौतम चॅटर्जी हे निवृत्त झाल्यामुळे महारेराचे अध्यक्षपद रिकामे होते. काही दिवसांपूर्वीच अजोय मेहता प्रधान सचिव पदावरून निवृत्त झाले होते.

महारेराच्या अध्यक्षपदी अजोय मेहता
SHARES

माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांची महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथोरिटीचे (महारेरा) च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मेहता यांना सोमवारी मंत्रालयात पद व गोपनीयतेची शपथ दिली. 

यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, महारेराचे सदस्य माजी अपर मुख्य सचिव विजय सतबीर सिंग, महारेरा अपिलीय प्राधिकरणाचे सदस्य एस. एस. संधू, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास तसेच महारेराचे सचिव डॉ. वसंत प्रभू व अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

गौतम चॅटर्जी हे निवृत्त झाल्यामुळे महारेराचे अध्यक्षपद रिकामे होते. काही दिवसांपूर्वीच अजोय मेहता प्रधान सचिव पदावरून निवृत्त झाले होते. यानंतर त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.अजोय मेहता हे १९८४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी सुरुवातीच्या काळात अहमदनगरचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले होते. मेहता यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तपदही सांभाळले आहे.



हेही वाचा -

मुंबईतील नेहरूनगर, टिळकनगरमध्ये वेगाने कोरोना रुग्णवाढ

नागरिकांच्या सुरक्षेसाठी धारावीत पुन्हा चाचण्यांत वाढ

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा