Advertisement

भारत बंदला माथाडी कामगारांचा पाठिंबा, एपीएमसी मार्केट बंद राहणार

भारत बंदला माथाडी कामगारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मंगळवारी एपीएमसीमधील भाजी, फळ आणि कांदा-बटाटा मार्केट एक दिवस बंद राहणार आहे.

भारत बंदला माथाडी कामगारांचा पाठिंबा, एपीएमसी मार्केट बंद राहणार
SHARES

शेतकरी कायद्याविरोधात शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबरला 'भारत बंद'ची हाक दिली आहे. या बंदला आतापर्यंत अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. भारत बंदमध्ये नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटही सहभागी होणार आहे. भारत बंदला माथाडी कामगारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मंगळवारी एपीएमसीमधील भाजी, फळ आणि कांदा-बटाटा मार्केट एक दिवस बंद राहणार आहे.

केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन कायद्याविरोधात राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील माथाडी कामगार आणि व्यापारी मंगळवारी या संपात सहभागी होणार आहेत. शेतकऱ्यांच्या देशव्यापी संपात व्यापारी व माथाडी कामगार सहभागी होणार असा बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत माथाडी नेते नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व सर्व बाजारसमितीचे संचालक उपस्थित होते.

नवीन कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे. शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये आतापर्यंत अनेकदा बैठका झाल्या आहेत. पण त्यातून कोणताही तोडगा निघालेला नाही. आता ९ डिसेंबरला पुन्हा एकदा बैठक होणार आहे. 


हेही वाचा -

११ वीची दुसरी प्रवेश यादी जाहीर

मुंबईतील 'या' भागात पाणीपुरवठा होणार कमी दाबानं



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा