Advertisement

खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी पालिकेचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर जाहीर

दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांना खड्ड्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागू नये, यासाठी महापालिकेनं व्हॉट्सअॅपची सेवा सुरू केली आहे.

खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी पालिकेचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर जाहीर
SHARES

पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर अनेक खड्डे निर्माण होतात. काही ठिकाणी तर रस्त्यांची चाळण होते. त्यामुळे खड्ड्यातून मार्ग काढताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे वाहतूककोंडी, अपघात होणं यांसारख्या समस्यांना नागरिकांना तोंड द्यावं लागतं.

दरवर्षी पावसाळ्यात (Mumbai Rains) याच समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागतो. यासाठी BMC चं अप देखील गेल्यावर्षी लाँच करण्यात आलं होतं. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांना या समस्यांना तोंड द्यावं लागू नये, यासाठी महापालिकेनं व्हॉट्सअॅपची (Whatsapp) सेवा सुरू केली आहे. यासाठी पालिकेनं खास व्हॉट्सअॅप नंबर जाहीर केला आहे.

पालिकेनं म्हटलं आहे की, पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे दिसल्यास, व्हॉट्स-अॅपच्या माध्यमातून तक्रार करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी महापालिकेनं २४ वॉर्डांमधील इंजिनिअर्सचे व्हॉट्सअॅप नंबर नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.

अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही तक्रार नोंदवू शकता. यासाठी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे दिसल्यास नागरिकांना फोटोसह महापालिकेनं उपलब्ध करून दिलेल्या व्हॉट्सअॅप नंबरवर तक्रार करता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप शिवाय खड्ड्यांशी संबंधित तक्रारींचे निर्देश देण्याशिवाय, पालिकेच्या टोल-फ्री हेल्पलाईन क्रमांकावर देखील तुम्ही तक्रा नोंदवू शकता. या क्रमांकावर 1800-221 आपणास एमसीजीएम 24/7 अॅपद्वारे -293 वर सकाळी 9 ते संध्याकाळी 9 या वेळेत तुम्हाला संपर्क साधता येईल.

यासंदर्भात एका पालिका अधिकाऱ्यानं सांगितलं की, रस्ता अभियंत्यांचे व्हॉट्सअ‍ॅप नंबर सामायिक करण्याचा निर्णय नागरिकांना मदत करण्यासाठी घेण्यात आला. तक्रार मिळाल्यानंतर ४८ तासांत खड्ड्यांची समस्या दूर होईल.

मुंबईत दरवर्षी खड्ड्यांची समस्या निर्माण होते. पावसाळ्यात परिस्थिती विशेष वाईट असते. पालिकेनं शहरभरातील प्रलंबित प्रकल्पांवर मान्सूनपूर्व काम केलं असलं तरी अजूनही हे खड्डे अस्तित्वात आहेत.



हेही वाचा

MAHADISCOM Recruitment: महावितरणमध्ये ७ हजार पदांची भरती, पात्र उमेदवारांची यादी आठवडाभरात

Guidelines For Weddings: आता, लग्न समारंभात उपस्थित राहू शकतात ५० जण

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा