Advertisement

दहिसर आणि मालाडमध्ये पालिकेचे दोन जलतरण तलाव खुले

सध्या मुंबईत बीएमसीचे एकूण सहा जलतरण तलाव आहेत.

दहिसर आणि मालाडमध्ये पालिकेचे दोन जलतरण तलाव खुले
SHARES

पश्चिम उपनगरातील नागरिकांसाठी दोन स्विमिंग पूल खुले झाले आहेत. दहिसर आणि मालाड इथल्या स्विमिंग पूलचे उदघाटनाशिवाय लोकार्पण करण्यात आले आहे.

मुंबईत पालिकेचे सध्या एकूण सहा स्विमिंग पूल आहेत. आणखी सात ठिकाणी स्विमिंग पूल बांधण्याचे काम सुरू आहे. लवकरच हे स्विमिंग पूल नागरिकांसाठी खुले करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. त्यापैकी मालाड पश्चिम आणि दहिसर पश्चिम येथील स्विमिंग पूल १ एप्रिलपासून खुले करण्यात आले आहेत.

मुंबईत पालिकेचे सध्या एकूण सहा स्विमिंग पूल आहेत. त्यापैकी दादर, कांदिवली, दहिसर आणि चेंबूर येथील तरण तलाव पालिकेमार्फत चालवले जातात. तर मुलुंड येथील प्रियदर्शिनी क्रीडा संकुल आणि अंधेरी येथील शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल येथील स्विमिंग पूल हे एका संस्थेला चालवण्यासाठी देण्यात आले आहेत.

आणखी सात नवीन स्विमिंग पूलपैकी चार पूल पश्चिम उपनगरात असतील तर शहर भागात दोन आणि पूर्व उपनगरात एक तलाव असेल. त्यापैकी दहिसर (पश्चिम) येथील कांदरपाडा परिसरातील जलतरण तलाव आणि मालाड (पश्चिम) येथील चाचा नेहरु मैदानजवळच्या जलतरण तलावाचे लोकार्पण झाले आहे.

आणखी कुठे होणार स्विमिंग पूल

अंधेरी (पश्चिम) येथील गिल्बर्ट हिल स्विमिंग पूल, अंधेरी (पूर्व) येथील कोंडिविटा गाव स्विमिंग पूल, वरळी येथील वरळी जलाशय टेकडी स्विमिंग पूल, विक्रोळी (पूर्व) येथील टागोर नगर स्विमिंग पूल आणि वडाळा येथील वडाळा अग्निशमन केंद्र स्विमिंग पूल या ७ ठिकाणी नवीन जलतरण तलाव बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे.

तलाव बांधून पूर्ण झाल्यानंतर आणि लोकार्पण झाल्यानंतर तेथील सभासद नोंदणी प्रक्रिया देखील सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाद्वारे देण्यात आली आहे.



हेही वाचा

डोंबिवलीहून २० मिनिटांत ठाणे गाठा, मेपर्यंत पूल खुला होणार

बाणगंगेपर्यंत पोहोचणे होणार सोपे, कवळे मठ ते बाणगंगा नवा रस्ता बनणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा