Advertisement

दुरुस्तीसाठी चर्नीरोड स्थानकातील पादचारी पूल ६० दिवस बंद


दुरुस्तीसाठी चर्नीरोड स्थानकातील पादचारी पूल ६० दिवस बंद
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्नी रोड स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील पादचारी पूल दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला शुक्रवारी २८ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. हा पादचारी पूल चर्नी रोड स्थानकाच्या दक्षिणेकडील बाजूचा असल्यानं प्रवाशांनी उत्तरेकडील पादचारी पूलाचा वापर करण्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात येत आहे.

विशेष पथकाचा सल्ला

पश्चिम रेल्वेवरील स्थानकांवरील पुलांसह रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) आणि पादचारी पूल (एफओबी) या पुलांची पाहणी करण्यात आली आहे. या पुलांच्या पाहणीनुसार, चर्नी रोड स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरील पादचारी पुलाची डागडूजी करण्याचा सल्ला विशेष पथकाने पश्चिम रेल्वेला दिला आहे. विशेष पथकाच्या सल्ल्यानुसार, शुक्रवार दि. २८ सप्टेंबर ते सोमवार दि. २६ नोव्हेंबर या ६० दिवसांत या पुलाच्या दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे



हेही वाचा -

मुंबई-गोवा महामार्गाचं केवळ २० किमीचं काम पूर्ण!

मेट्रो-४ पण वादात! कास्टिंग यार्डला पर्यावरणप्रेमींचा विरोध



 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा