Advertisement

सिडकोने पोलिसांच्या घरांच्या किमती ३ लाखांनी वाढवल्या, मनसेचा आंदोलनाचा इशारा

कोरोना काळात पोलिसांनी केलेल्या कामाचं कौतुक करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबईत पोलिसांसाठी घरे घोषीत केली होती. सिडकोने दोन वर्षांपूर्वी घोषीत केलेल्या १५ हजार घरांमधील ४६०० घरे बाकी होती.

सिडकोने पोलिसांच्या घरांच्या किमती ३ लाखांनी वाढवल्या, मनसेचा आंदोलनाचा इशारा
SHARES

कोरोना काळात जीव मुठीत घालून आपलं कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना सिडकोकडून चढ्या दराने घरांची विक्री केली जात आहे. २०१८ साली विकलेल्या घरांच्या किंमतीत सिडकोने तब्बल ३ लाख रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे ही घरे आता पोलिसांना परवडणारी राहिली नाहीत.  या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. घरांच्या किंमती कमी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेने दिला आहे.

कोरोना काळात पोलिसांनी केलेल्या कामाचं कौतुक करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबईत पोलिसांसाठी घरे घोषीत केली होती. सिडकोने दोन वर्षांपूर्वी घोषीत केलेल्या १५  हजार घरांमधील ४६०० घरे बाकी होती. ही घरे पोलिसांना देण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त केली होती. यानुसार सिडकोने पोलिसांसाठी घरांची लॉटरी काढली. मात्र, ही घरं अडीच ते तीन लाख रुपयांनी महाग विकली जात  असल्याचा आरोप पोलिसांच्या नातेवाईकांनी केला आहे

घणसोली, खारघर, तळोजा, रसायनी, द्रोणागिरी भागात सिडकोने उभारलेल्या गृहप्रकल्पात पोलिसांना घरं देण्यात आली आहेत. २०१८ साली विकलेल्या या घरांच्या किंमती पेक्षा आता २.५ ते ३ लाख रूपये वाढवून पोलिसांना सिडकोने दिली आहेत. २०१८ मध्ये अत्यल्प उत्पन्न गटातील घराची किंमत १८ लाख ते १८ लाख ५५ हजार होती. मात्र, या घरांची किमत आता सिडकोने २० लाख १० हजार ते २१ लाख ६० हजार अशी केली आहे.

तर अल्प उत्पन्न घराची किंमत २०१८ ला २५ लाख ६ हजार रुपये होती. या घरांची किंमत आता २८ लाख ४५ हजार करण्यात आली आहे. घरांच्या किमती वाढवण्याएेवजी सरकारने कोरोना योध्द्यांना स्वस्तात घरे द्यायला पाहिजे होते, अशी मागणी सरकारकडे पोलिसांनी केली आहे.



हेही वाचा  -

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी १ हजार झाडांवर कुऱ्हाड

ई-चलन न भरल्यास लायसन्स होणार रद्द, दंड न भरलेल्या २ हजार जणांचे परवाने होणार रद्द



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा