Advertisement

मेट्रो-३ मार्गिकेतील २६ भुयारी स्थानकांच्या बांधकामाला वेग

कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पाच्या मार्गिकेवरील २६ मेट्रो स्थानकांच्या बांधकामाला वेग आला

मेट्रो-३ मार्गिकेतील २६ भुयारी स्थानकांच्या बांधकामाला वेग
SHARES

कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पाच्या मार्गिकेवरील २६ मेट्रो स्थानकांच्या बांधकामाला वेग आला असून, या मार्गिकेतील भुयारी मेट्रो स्थानकांचं बांधकाम सरासरी ४६ टक्के झालं आहे. ३२ पैकी २८ टनेलचं काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडनं (एमएमआरसीएल) पूर्ण केलं आहे. मेट्रो-३ या मार्गिकेपैकी ८२ टक्के भूमिगत मार्गिका तयार झाल्यावर आता एमएमआरसीएलनं या मार्गिकेतील भूमिगत स्थानकांच्या बांधकामांचा वेग वाढवला आहे.

मेट्रो-३ मार्गिकेतील २६ स्थानकांमधील ७ स्थानकांचं ६० टक्क्यांपेक्षा जास्त काम झाले आहे. तर दोन स्थानकांचे ७० टक्क्यांपेक्षा जास्त आणि ७ स्थानकांचं ५० टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण करण्यात आलं आहे. एमआयडीसी मेट्रो स्थानकाचं काम ७७ टक्के आणि विधानभवन स्थानकाचं काम ७२.६० टक्के झालं आहे. तर सीप्झ, मरोळ नाका, आंतरदेशीय विमानतळ, सांताक्रुझ, शीतलादेवी, सीएसएमटी आणि सिद्धिविनायक स्थानकांचे ६० टक्क्यांपेक्षा जास्त काम झाले असल्याचे एमएमआरसीएलनं स्पष्ट केलं आहे.

कुलाबा-वांद्रे-सीप्झदरम्यान तयार होत असलेली ३३ किमी लांबीची भूमिगत मेट्रो मार्गिका २ टप्यांमध्ये सुरू करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. आरे कॉलनी ते बीकेसी या पहिल्या टप्प्यामध्ये डिसेंबर २०२१मध्ये आणि कुलाबा-वांद्रे-सीप्झ या संपूर्ण मार्गिकेवर जून २०२२ पर्यंत मेट्रो सुरू करण्याची योजना एमएमआरसीनं बनवली आहे.

एमएमआरसीएलमार्फत जूनपासून आरे ते बीकेसी दरम्यानच्या मार्गिकेवर रूळ टाकण्याच्या कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. या कामासाठी लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो लिमिटेड (एलएनटी कंस्ट्रक्शन) या कंपनीसोबत आधीच करार केला आहे. यानुसार कंपनीला डिझाईन, खरेदी, आपूर्ती, रूळ टाकणे, परीक्षण करणे अशी कामे करावी लागणार आहेत.



हेही वाचा -

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा सुटण्याची शक्यता

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं ३० जूनपर्यंत रेल्वेगाड्या रद्द



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा