स्कायवॉक गेले खड्ड्यात

मुंबई - मुंबईतल्या अनेक स्कायवॉकची दुरवस्था झाली आहे. स्कायवॉकवर कुठे जिने खचलेत, तर कुठे लाद्या उखडल्यात. रात्रीचं सोडा पण दिवसा ढवळ्या देखील हे स्कायवॉक गर्दुल्ल्यांचा अड्डा झालाय. तब्बल 865 कोटी रूपये खर्च करत एमएमआरडीएने मुंबईभर 36 स्कायवॉक बांधले. पण, हा पैसा पाण्यात गेल्याचंच चित्र पहायला मिळत आहे. 15 कोटी खर्च करूनही दहिसरमध्ये स्कायवॉकचा काही भाग कोसळला होता आणि त्यात दोन पादचारीही जखमी झाले होते.

एमएमआरडीएने सर्वच्या सर्व स्कायवॉक पालिकेकडे हस्तांतरीत केले आहेत. आता त्याची देखभाल पालिकाच करत असल्याचं सांगत एमएमआरडीएने चक्क हात वर केले. यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. प्रकल्प एमएमआरडीएचा, बांधकामदेखील एमएमआरडीएचं. याच निकृष्ट बांधकामामुळे स्कायवाॅकची दुरवस्था झाली असताना त्याचा दोष मात्र केवळ देखभाल करणाऱ्या पालिकेवर. यावर स्कायवाॅकच्या सेफ्टी आॅडीटच्या मागणीसह संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी होत आहे. मात्र, ही मागणी मान्य कधी होणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

Loading Comments