Advertisement

'सीएसएमटी'बाहेरील 'सब वे' त लागणार एस्केलेटर्स

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चर्चगेट ही स्थानकं देशातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकं मानली जातात. या स्थानकांवर वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेता मुंबई महापालिकेनं सबवेमध्ये एस्केलेटर्स लावण्याचा निर्णय घेतला आहे.

'सीएसएमटी'बाहेरील 'सब वे' त लागणार एस्केलेटर्स
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चर्चगेट ही स्थानकं देशातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकं मानली जातात. या स्थानकांवर वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेता मुंबई महापालिकेनं सबवेमध्ये एस्केलेटर्स लावण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीचा सीएसएमटी स्थानकाजवळ असलेला हिमालय पूल दुर्घटनाग्रस्त झाला होता. त्यानंतर महापालिकेने या घटनेतून बोध घेत एस्केलेटर्स लावण्याचा निर्णय घेतला आहे.


रूग्णांच्या सोयीसाठी

सीएसएमटी स्थानकाजवळ अनेक रूग्णालयं आहेत. त्यामुळं त्या ठिकाणी रूग्णांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. तसंच ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांनाही जाण्यायेण्यास मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कोणाचीही गैरसोय होऊ नये, यासाठी हे एस्केलेटर्स लावण्यात येणार आहेत.

चर्चगेट स्थानकावर सात तर सीएसएमटी स्थानकावर ४ एस्केलेटर्स लावण्यात येणार आहेत. ए वॉर्डकडून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून हा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त आता रेल्वेनेही अनेक स्थानकांवर एस्केलेटर्स लावण्याचा निर्णय घेतला आहे.




हेही वाचा -

'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमा रिलिज होऊ देणार नाही, मनसेचा इशारा

न्यायालयात गैरहजर राहण्यासाठी चोक्सीची याचिका



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा