Advertisement

फुड सेफ्टी अॅण्ड स्टॅण्डर्ड्स अॅथॉरिटी देणार पाककलेचे धडे!


फुड सेफ्टी अॅण्ड स्टॅण्डर्ड्स अॅथॉरिटी देणार पाककलेचे धडे!
SHARES

चमचमीत, चविष्ट, पौष्टिक पदार्थ बनवणे आणि खाणे वा खायला घालणे या गोष्टींचा आवड असणारे नेहमीच वेगवेगळ्या पाककृतींच्या शोधात असतात. टीव्ही, मोबाईल, पाककृतींची पुस्तके आणि मोबाईल अॅप या माध्यमातून विविध प्रकारच्या, वैशिष्टयपूर्ण पाककृती काही सेंकदात उपलब्ध होतात. पण चमचमीत, चविष्ट, पौष्टिक पदार्थांच्या पाककृतीला जोडूनच पदार्थ सुरक्षित असणेही तितकेच महत्त्वाचे. 

कोणते अन्न पदार्थ कोणत्या ऋतूमध्ये खावेत? कोणत्या ऋतूत टाळावेत? कोणत्या राज्यात, कोणत्या वातावरणात काय खावे? आणि काय टाळावे? यासंबंधीच्या इत्थंभूत माहितीसह देशभरातील पाककृतींची माहिती देणारे मोबाईल अॅप तयार करण्यासाठी फुड सेफ्टी अॅण्ड स्टॅण्डर्ड्स अॅथॉरिटी ऑफ इंडिया (एफएसएसएआय)ने यासाठी पुढाकार घेतला आहे. येत्या काही महिन्यांतच 'फुडकास्ट' नावाने पाककृतींचं मोबाईल अॅप लॉन्च करण्यात येणार असल्याची माहिती एफएसएसएआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

दिल्लीत नुकतीच 'फुडकास्ट' मोबाईल अॅपची घोषणा करण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले आहे. 'फुडकास्ट' अॅपसाठी अॅक्सिस बँकेशी करार करण्यात आला आहे. भारतीतील विविध राज्यातील पाककृतींची माहिती या अॅपवर उपलब्ध होणार आहे. अंदाजे 200 पाककृती सुरूवातीला यामध्ये समाविष्ट असण्याची शक्यता आहे. सुरक्षित अन्नपदार्थांचे सेवन करण्याच्या दृष्टीनेही विविध प्रकारची माहिती या अॅपमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा