अन्न हे 'ऑनलाईन' पूर्णब्रम्ह !

विक्रोळी - महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर गृहिणी आणि बचतगटांमधील महिलांसाठी अमेरिकेत राहत असलेल्या समीर पाथरे या भारतीय तरुणाने एक वेबसाईट बनवली आहे. ज्यातून आता महिलांना आपण बनवलेले खाद्यपदार्थ मुंबईभरात विकता येणार आहेत. www.homefoodish.com या संकेतस्थळावरून महिलांना हे खाद्यपदार्थ मुंबईत विकता येणार आहेत. या संकेतस्थळाचे औपचारीक उद्घाटन सोमवारी गृहिणी शालिनी साळवी यांनी केले. इंटरनेटच्या युगात हल्ली सर्वच एका क्लिकवर मिळते. त्यामुळे आजच्या ऑनलाईन जमान्यात या संकेतस्थळाचा ग्राहक आणि विक्रेते अशा दोघांनाही लाभ घेता येईल यात शंका नाही.

Loading Comments