Advertisement

डिलाइल पूल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार

पुलाचा पश्चिम भाग, जो BMC प्रथम उघडण्याची योजना आखत आहे, तोच GK मार्ग NM जोशी मार्गाशी जोडेल.

डिलाइल पूल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार
(Image: Twitter/Aaditya Thackeray)
SHARES

लोअर परेलचा डिलाइल पूल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती आहे. सुरुवातीला मेच्या पहिल्या आठवड्यात या पुलाचा केवळ एक भाग सुरू होईल. त्यानंतर ३० जूनपर्यंत संपूर्ण पूल खुला करणार असल्याची माहिती आहे.

मात्र या डिलाइल पुलाचं काम दिलेल्या मुदतीत पूर्ण होण्याची शक्यता नसल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आला आहे. याआधी पुलाचं काम पूर्ण करण्यासाठी पालिकेने ३१ मे ही मुदत दिली होती. डिलाइल पूल हा लोअर परेल, वरळी, प्रभादेवी आणि करीरोड तसंच भायखळा आणि त्याच्या आजूबाजूच्या मार्गासाठी महत्त्वाचा आहे.

डिलाइल पूल असुरक्षित असल्याचं समोर आल्यानंतर तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. जवळपास पाच वर्षांपूर्वी हा पूल बंद झाला होता. हा पूल बंद असल्याचे वाहतूक कोंडी होऊन हजारो वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो आहे. पण आता हा पूल लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आहे.

हा पूल आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात येतो. आदित्य ठाकरेंनी या पुलाचं काम रखडल्याच्या मुद्द्यावरुन एक ट्विट केलं आहे. दोन आठवड्यांहून अधिक काळ नियमित पुरवठादारांकडून खडी पुरवठा न झाल्याने मुंबईतील बहुतांश रस्त्यांची आणि पुलांची कामे अक्षरशः बंद असल्याचे ऐकून धक्का बसला असल्याचं आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या पुलाच्या बांधकामासाठी ज्याठिकाणाहून खडी येते, तेथील नवी मुंबईतील रेडी-मिक्स कॉंक्रिट प्लांटमध्ये अनेक समस्या आहेत. मागील जवळपास १५ दिवसांपासून काँक्रिटीकरणाच्या कामासाठी खडी मिळाली नाही, त्यामुळे कामात अडथळा येत आहे.

सोमवारपासूनच आवश्यक प्रमाणात खडीचा साठा येऊ लागला आहे. मात्र या पुलाचं काम वेगाने होण्यासाठी जितक्या प्रमाणात खडीची आवश्यकता आहे, तितक्या प्रमाणात खडी उपलब्ध होत नसल्याची माहितीही अधिकाऱ्याने दिली आहे.



हेही वाचा

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे बोगदा जानेवारी 2025 मध्ये उघडणार

बोरिवली-ठाणे बोगद्याचे काम पावसाळ्यापर्यंत सुरू होणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा