Advertisement

म्हाडाच्या ७५०० घरांची लॉटरी, जितेंद्र आव्हाडांची घोषणा

म्हाडाची घरं ठाण्यात भंडारली आणि गोटेघर इथं आहेत. कल्याणमध्ये शिरडोने कोणी इथल्या घरांसाठी लॉटरी काढण्यात येईल.

म्हाडाच्या ७५०० घरांची लॉटरी, जितेंद्र आव्हाडांची घोषणा
SHARES

म्हाडा लवकरच ठाणे आणि कल्याण परिसरात ७५०० घरांची लॉटरी जाहीर करणार आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

म्हाडाची घरं ठाण्यात भंडारली आणि गोटेघर इथं आहेत. कल्याणमध्ये शिरडोने कोणी इथल्या घरांसाठी लॉटरी काढण्यात येईल. ही लॉटरीची प्रक्रिया मार्चमध्ये सुरु होणं अपेक्षित आहे. ही सोडत मे मध्ये जाहीर होऊ शकते.

विरारमध्ये पोलिसांसाठी बांधण्यात आलेल्या घरांची लॉटरी बुधवारी काढण्यात आली. ज्या पोलिसांना घर हवं आहे त्यांनी कोकण म्हाडाशी संपर्क साधावा असं आवाहन आव्हाड यांनी यावेळी केलं. पोलीस, चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांना घरं उपलब्ध करून देणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी म्हाडाची मुंबईची लॉटरी गुरुवारी जाहीर होणार असल्याची माहिती दिली आहे. मुंबईमधील ना. म. जोशी मार्गावरील ३०० घरांची लॉटरी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास जाहीर होणार आहे.

दरम्यान,कोळीवाडे ही गावठाणे आहेत.गरजेनुसार पूर्व परंपरेने ही घरं बांधली असून जरी ही बैठी घरं असली तरी तिथे एसआरए योजना लागू होणार नाही. कोळीवाड्यांना एफएसआय देऊन त्यांचा विकास व्हावा असा प्रयत्न आहे,” अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.



हेही वाचा -

रेल्वे प्रवाशांसाठी मोबाइल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन यंत्रणा

आधार कार्ड 'या' १५ गोष्टींसाठी सक्तीचं



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा