'बंद करा, बंद करा, हा आवाज बंद करा'

मुंबई - विचारही करवत नाही ना? पण असाच आवाज मरोळ परिसरातील रहिवासी रोज सहन करत आहेत आणि ते ही रात्रंदिवस... पाली मैदानात मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे या परिसरातले रहिवासी सध्या हैराण झाले आहेत. छोट्या मशीन्सचा आवाज 75 ते 97 डेसिबलच्या घरात जातो. जर एकाच वेळी दोन मशीन्स सुरू झाल्या की मग तर आवाज 100 डेसिबलची पातळी ओलांडतो. सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 पर्यंत हा आवाज येथील रहिवासी सहन करतात. शिवाय रात्री अपरात्रीही हे काम सुरू असते, असा आरोप रहिवासी करत आहेत.

सामाजिक कार्यकर्त्या निकोलस अल्मेडा यांनी एमएमआरसीच्या व्यवस्थापकिय संचालिका अश्विनी भिडे आणि अन्य अधिकाऱ्यांविरोधात अंधेरी न्यायालयात खटला दाखल केला आहे. तर एमएमआरसीचे कार्यकारी संचालक आर. रमण्णा यांनी मात्र असे असेल तर लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.

2020 पर्यंत मेट्रोचे काम संपवायचे आहे. त्यामुळे रात्रंदिवस काम सुरू आहे. पण या या आवाजाला कंटाळून बंद करा बंद करा हा आवाज बंद करा असे बोलायची वेळ या रहिवाशांवर आलीय.

Loading Comments