Advertisement

मेट्रोचा मोर्चा आता मुंबईतल्या तिवरांकडे


SHARES

मुंबई - काही दिवसांतच मुंबईतली तिवरं नाहीशी होणार आहेत. याचं कारण आहे मुंबईकरांच्या सोयीसाठी उभारण्यात येणारा मेट्रो 3 प्रकल्प. आधीच हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात होणाऱ्या झाडांच्या कत्तलीवरून चर्चेत आहे. त्यात अजून एक भर पडलीय. या प्रकल्पात 1.69 हेक्टर वन जमिनीवरील 231 तिवरांची कत्तल होणार असल्याची धक्कादायक कबुली खुद्द केंद्रीय वन विभागाने दिलीय आणि तीही लोकसभेत.

तिवरांची कत्तल करत पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या एमएमआरसीचा आणखी एक प्रताप यानिमित्तानं समोर आलाय. एका तिवराच्या मोबदल्यात एमएमआरसी 4 तिवरांचे पुनर्रोपण करणार आहे. एमएमआरसीच्या या अजब दाव्यामुळे तिवरांचे अभ्यासक आणि पर्यावरण प्रेमी पुरते नाराज झालेत.

केंद्रीय वन विभागाने दिलेल्या उत्तरावरून पर्यावरण विभाग किती बेजबादारपणे काम करतोय हे दिसून येतंय. त्यामुळे आता ही तिवरं वाचवण्यासाठी वनशक्तीनं आवाज उठवलाय. मात्र पर्यावरण प्रेमींच्या लढ्याला न्याय मिळेल का हाच या घडीचा सर्वात मोठा प्रश्न आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा