Advertisement

Exclusive: प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांनाही नकोत परळमधील महागडी घरं!

मुंबईतील ८१९ घरांसाठी १० नोव्हेंबर २०१७ मध्ये मुंबई मंडळानं लाॅटरी काढली होती. या लाॅटरीत लोअर परळमधील उच्च गटातील ३६ घरांचा समावेश होता. यातील २ घरं १ कोटी ९५ लाखांचं तर उर्वरित ३४ घरं सव्वा कोटी किंमतीची होती. ही घरं महाग असल्यानं या घरांना प्रतिसाद मिळणार नाही, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. अखेर ही शक्यता आता खरी ठरताना दिसत आहे. कारण ३६ घरांपैकी २९ घरं विजेत्यांनी नाकारली आहेत.

Exclusive: प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांनाही नकोत परळमधील महागडी घरं!
SHARES

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या नोव्हेंबर २०१७ मधील लाॅटरीतील लोअर परळ येथील महागड्या घरांमुळे मुंबई मंडळ चांगलंच अडचणीत आल्याचं चित्र आहे. लोअर परळमधील ३६ घरांपैकी २९ घरं विजेत्यांनी म्हाडाला परत केली आहेत. त्यामुळं ही घरं प्रतीक्षा यादी (वेटींग लिस्ट)वरील विजेत्यांना देण्याची प्रक्रिया मुंबई मंडळानं सुरू केली. पण प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांनी देखील ही घरं घेण्यास अनुत्सुकता दाखवत घरं परत केल्याची माहिती मंडळातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मुंबई मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना याला दुजोरा दिला आहे.


कधी काढली होती लाॅटरी?

मुंबईतील ८१९ घरांसाठी १० नोव्हेंबर २०१७ मध्ये मुंबई मंडळानं लाॅटरी काढली होती. या लाॅटरीत लोअर परळमधील उच्च गटातील ३६ घरांचा समावेश होता. यातील २ घरं १ कोटी ९५ लाखांचं तर उर्वरित ३४ घरं सव्वा कोटी किंमतीची होती. ही घरं महाग असल्यानं या घरांना प्रतिसाद मिळणार नाही, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

अखेर ही शक्यता आता खरी ठरताना दिसत आहे. कारण ३६ घरांपैकी २९ घरं विजेत्यांनी नाकारली आहेत. यासंबंधीचं वृत्त दोन महिन्यांपूर्वी सर्वप्रथम 'मुंबई लाइव्ह'नं दिलं होतं. इतक्या मोठ्या संख्येनं एकाचवेळी उच्च गटातील सर्वाधिक किमतीची घरं नाकारली जाणं हा मोठा धक्का मुंबई मंडळासाठी मानला जात आहे.


घरं रिकामी राहणार?

आता हा धक्का आणखी तीव्र होत चालला आहे. विजेत्यांनी ही घर नाकारली तरी प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना ही घरं वितरीत करू, त्यामुळं ही घरं रिकामी राहणार नाहीत असा दावा मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केला होता. अखेर हा दावाही फोल ठरला आहे. कारण प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांनीही लोअर परळची महागडी घरं नाकारली आहेत. ही घरं महाग असल्याचं स्पष्ट कारण देत विजेत्यांसह प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांकडून ही घरं नाकारली जात आहेत. त्यामुळं ही मुंबई मंडळावर आलेली मोठी नामुष्कीच म्हणावी लागेल.


पुढच्या लाॅटरीत

याविषयी मुंबई मंडळाचे सहमुख्य अधिकारी संजय भागवत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लोअर परळमधील २९ घरं विजेत्यांनी परत केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तर प्रतीक्षा यादीवरील ही काही विजेत्यांनी घर घेण्यास अनुत्सुकता दाखवल्याचंही स्पष्ट केलं आहे. त्याचवेळी प्रतिक्षा यादीवरील जे विजेते घरं घेतील त्यांना घर वितरीत करत जी काही घरं शिल्लक राहतील ती पुढच्या लाॅटरीत समाविष्ट करू, असं सांगितलं आहे.



हेही वाचा-

Exclusive: म्हाडा तोंडावर आपटलं! परळमधली २९ महागडी घर विजेत्यांनी केली परत

स्वप्नांच्या पलिकडले! लोअर परळच्या घराची किंमत २ कोटींवर



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा