Advertisement

आर्किटेक्ट चंदन केळकर यांच्या कार्यालयावर मोतीलाल नगर रहिवाशांचा मोर्चा


आर्किटेक्ट चंदन केळकर यांच्या कार्यालयावर मोतीलाल नगर रहिवाशांचा मोर्चा
SHARES

गेल्या काही दिवसांपासून गोरेगाव पश्चिममधील मोतीलाल नगर येथे म्हाडा अधिकाऱ्यांसोबत मिळून आर्किटेक्ट चंदन केळकर चाळवासियांची फसवणूक करत असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. या गैरव्यवहारावर आवाज उठवण्यासाठी मोतीलाल नगर विकास समिती, पत्रा चाळ संघर्ष समिती यांसह मोतीलाल नगर स्थानिक रहिवाशांतर्फे चंदन केळकर यांच्या कार्यालयावर सोमवारी धडक मोर्चा काढण्यात आला. 


प्रकरण काय ?

गोरेगाव पश्चिमेकडील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकासाच्या सिद्धार्थ नगरकरांना देशोधडीला लावून चंदन केळकर यांनी मोतीलाल नगरच्या अभिन्यासामधील रहिवाशांची हक्काची घरे सिद्धार्थ नगरच्या अभिन्यासात समाविष्ट केली आहेत. याबाबत मोतीलाल नगर विकास समिती आणि पत्रा चाळ संघर्ष समितीने म्हाडा व चंदन केळकर यांना लेखी निवेदन दिले होते. यानतंर वास्तुविशारद चंदन केळकर यांनी चूक कबूल करून ती दुरुस्त करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु यावर प्रत्यक्ष कोणतीही कृती न करता जुनाच अभिन्यास मंजूर करून घेतला. अखेर नाईलाज म्हणून मोतीलाल नगर विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केळकर यांच्या कार्यालयावर सोमवारी धडक मोर्चा काढला. या मोर्चात अनेक रहिवाशी सहभागी झाले होते. 

या धडक मोर्च्यावेळी पत्रा चाळ संघर्ष समितीद्वारे भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तक्रार दाखल करून त्यांची सखोल चौकशी करा अशी मागणी करण्यात आली. त्याशिवाय यात सहभागी असलेल्या अनेक म्हाडा अधिकाऱ्यांचीही चौकशी करावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली. 


हेही वाचा - 

परीक्षा संपली आणि 'ती' परतली...

आपण यांना ओळखलंत का?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा