Advertisement

एसटी चालक, वाहकांसाठी एसी विश्रामगृह बांधण्यात येणार

एसटी कर्मचाऱ्यांसाठी सर्व सुविधांनी सुसज्ज विश्रामगृहे प्रत्येक जिल्हा मुख्यालयात बांधली जावीत, असे दीपक केसरकर म्हणाले.

एसटी चालक, वाहकांसाठी एसी विश्रामगृह बांधण्यात येणार
SHARES

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) चालक आणि वाहकांसाठी मुंबई सेंट्रल येथे अत्याधुनिक वातानुकूलित विश्रामगृह बांधण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री आणि मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. सोमवारी ‘हिरकणी’ कक्षाच्या उद्घाटना दरम्यान त्यांनी ही घोषणा केली. 

येत्या काळात राज्यभरातून मुंबई सेंट्रल आगारात येणाऱ्या चालक-वाहकांना विश्रांतीसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

एसटीच्या मुंबई सेंट्रल आगारात जिल्हा नियोजन मंडळाच्या तीन टक्के निधीतून बांधण्यात आलेल्या पहिल्या 'हिरकणी' कक्षाचे उद्घाटन दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले.

एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, मुंबई शहराचे जिल्हाधिकारी राजीव निवटकर आणि एसटीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी केसरकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधून कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

चालक आणि वाहकांसाठी उपलब्ध असलेली स्वच्छतागृहे गैरसोयीची असल्याचे त्यांना आढळले. त्यानंतर केसरकर यांनी जिल्हा नियोजन विकास निधीतून मुंबई मध्यवर्ती बसस्थानकावर महिला आणि पुरुषांसाठी अत्याधुनिक सुविधा असलेले वातानुकूलित विश्रामगृह उभारण्याचे निर्देश मुंबई शहराच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

केसरकर यांनी निर्देश दिले की, भविष्यात एसटी कर्मचाऱ्यांसाठी सर्व सुविधांनी सुसज्ज अशी विश्रामगृहे जिल्हा नियोजन व विकास आराखड्यातून प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी बांधण्यात यावीत.



हेही वाचा

मुंबई कोस्टल रोड प्रकल्प : दुसरा भूमिगत बोगदा खोदण्यात यश

मुंबईकरांनो लक्ष द्या! पालिकेकडून 120 सोसाट्यांवर गुन्हे दाखल

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा