बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी गुरुवारी, २३ सप्टेंबर रोजी सांगितलं की, मुंबईत बांधण्यात येणारा महत्त्वाकांक्षी ८ लेनचा कोस्टल रोड नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल.
पालिका आयुक्त पुढे म्हणाले की, १२ हजार ७०० कोटी रुपयांच्या प्रकल्पानं मरीन ड्राइव्ह ते वरळी या कोस्टल रोड प्रकल्पाचं ४० टक्के भौतिक काम पूर्ण केलं आहे. ज्यात एक किमी लांबीच्या बोगद्याचा समावेश आहे.
BMC’s Mumbai Coatal Road Project.40% completed including 1 tunnel upto 1km under sea.https://t.co/FwZIwg1IN3
— Iqbal Singh Chahal (@IqbalSinghChah2) September 23, 2021
पालिका आयुक्तांनी पुढे सांगितलं की, मुंबई कोस्टल रोडचे काम तीन पाळ्यांमध्ये २४x७ सुरू आहे आणि नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल.
निवेदन जारी करताना ते म्हणाले की, आता फक्त ९०० मीटर लांबीचा बोगदा शिल्लक आहे. आपल्या देशात ४० फूट व्यासाचा समुद्राखालील हा पहिला प्रकार आहे.
चहल म्हणाले की, कोस्टल रोडमध्ये १८५२ भूमिगत कार पार्किंगसह कोस्टल रोडच्या मागे घेतलेल्या पुनर्प्राप्त जमिनीवर १२५ एकर बाग देखील समाविष्ट असेल.
ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प यापूर्वी २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलं होतं, परंतु खटल्यांमुळे तो विलंब झाला.
मुंबई उच्च न्यायालयानं जुलै २०१९ मध्ये कोस्टल रोड झोन (सीआरझेड) मंजुरी रद्द केल्यानंतर प्रकल्पाचे काम थांबवण्यात आले.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिल्यानंतर काम पुन्हा सुरू झालं.
हेही वाचा