Advertisement

'महारेरा'चं उल्लंघन करणारे ३१ बिल्डर रडारवर

'महारेरा' कायद्याचं उल्लंघन करत जाहिराती प्रसिद्ध करणाऱ्या आणखी ३१ बड्या बिल्डरांची मुंबई ग्राहक पंचायतीनं पोलखोल केली आहे. या ३१ बिल्डरांविरोधात शुक्रवारी, ९ फेब्रुवारीला रितसर तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अॅड. शिरिष देशपांडे यांनी दिली. त्यामुळे हे ३१ बिल्डर 'महारेरा'च्या रडारवर असणार आहेत.

'महारेरा'चं उल्लंघन करणारे ३१ बिल्डर रडारवर
SHARES

'महारेरा' कायद्यातील तरतुदींचं उल्लंघन करत बेकायदा जाहिरातीद्वारे ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या ७ बिल्डरांना नुकताच महारेरानं दणका दिला आहे. असं असताना आता 'महारेरा' कायद्याचं उल्लंघन करत जाहिराती प्रसिद्ध करणाऱ्या आणखी ३१ बड्या बिल्डरांची मुंबई ग्राहक पंचायतीनं पोलखोल केली आहे. या ३१ बिल्डरांविरोधात शुक्रवारी, ९ फेब्रुवारीला रितसर तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अॅड. शिरिष देशपांडे यांनी दिली. त्यामुळे हे ३१ बिल्डर 'महारेरा'च्या रडारवर असणार आहेत.


७ बिल्डरांविरोधात कारवाई

'महारेरा'चा नोंदणी क्रमांक आणि महारेराच्या वेबसाईटची माहिती प्रत्येक बिल्डरला जाहिरातीमध्ये नमूद करणं बंधनकारक आहे. पण बिल्डर मात्र या नियमांना न जुमानता राजरोसपणे गृहप्रकल्पाच्या जाहिराती प्रसिद्ध करत आहेत. ग्राहक पंचायतीनं गेल्या आठवड्यात अशाच ७ बिल्डरांविरोधात 'महारेरा'कडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार महारेरानं या सातही बिल्डरला दोषी ठरवत त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई केली आहे. ६ बिल्डरांना प्रत्येक दोन लाख तर एका बिल्डरला १२ लाखांचा दंड महारेरानं लावला आहे. दंडात्मक कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये बड्या बिल्डरांचाही समावेश आहे.


कोण आहेत बिल्डर?

बिल्डर 'महारेरा'चं उल्लंघन करत आहेत का? ग्राहकांची फसवणूक करत आहेत का? यावर बारकाईनं लक्ष ठेवणाऱ्या ग्राहक पंचायतीनं आता आणखी ३१ बिल्डर शोधून काढले आहेत. चैत्यन्य सृष्टी, अरिहंत, स्ट्राॅबेरी पार्क, साॅफ्ट काॅर्नर, मेट्रो वन, कर्म इन्फ्रास्ट्रक्चर, अशर, वाधवा ग्रुप, सुमित ग्रुप यासारख्या अनेक बड्या बिल्डरांचा यात समावेश आहे. 'महारेरा'ची नोंदणी न करताच प्रकल्पाची जाहिरात करणं, नोंदणी क्रमांक जाहिरातीत नमूद न करणं, 'महारेरा'च्या वेबसाईटची माहिती न देणं अशा नियमांचं उल्लंघन या बिल्डरांनी केलं आहे.


या बिल्डरांची तक्रार महारेराकडं नोंदवण्यात आली असून आता महारेरा या बिल्डरांना काय आणि कसा दणका देते याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.



हेही वाचा-

नियम धाब्यावर ठेवून जाहिरात? ७ बिल्डर आले गोत्यात!!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा