Advertisement

सोसायटीत पार्किंगसाठी जागा नाही? वाहतूक पोलीस करणार समस्या दूर

वाहतूक पोलिस आता बाहेर पार्किंगसाठी जागा तयार करण्याच्या उद्देशानं सोसायट्यांचं सर्वेक्षण करत आहेत.

सोसायटीत पार्किंगसाठी जागा नाही? वाहतूक पोलीस करणार समस्या दूर
SHARES

मुंबईतील जुन्या हाऊसिंग सोसायटींना कमी जागेमुळे पार्किंग करण्यास समस्या येत आहे. अनेक कॉम्प्लेक्स आणि निवासी युनिट्सचं बांधकाम जुनं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पार्किंगची पुरेशी जागा उपलब्ध नाही. यामुळे रहिवाशांना रस्त्यावर वाहनं उभी करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

रहिवाशांच्या चिंतेत भर टाकण्यासाठी वाहतूक पोलिसही अशा वाहनांवर कारवाई करतात. तथापि, हे लवकरच बदलू शकते, कारण वाहतूक पोलिस आता बाहेर पार्किंगसाठी जागा तयार करण्याच्या उद्देशानं सोसायट्यांचं सर्वेक्षण करत आहेत.

शहरातील काही सोसायट्यांमधील रहिवाशांनी रस्त्यावर वाहनं पार्क केली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली गेली. कारवाईनंतर वाहतूक विभागाला त्यांनी पत्र लिहिलं. आता कळालं आहे की, जेव्हा नवीन पार्किंग क्षेत्र तयार केलं जाईल तेव्हा केवळ रहिवाशांना तिथेच पार्किंग करण्याची परवानगी असेल.

सात रस्ताजवळील राऊंड बिल्डिंगमधील रहिवासी म्हणाले की, “आमची इमारत जवळपास १०० वर्ष जुनी आहे. पार्किंगची जागा नसल्यामुळे लोक रस्त्यावर पार्क करतात. यासंदर्भात इमारत समितीनं वाहतूक पोलिसांना अनेक पत्रं लिहिली आहेत. लोकांना पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पोलिसांना विनंती केली आहे.”

पोलिसांनी केलेल्या सर्वेक्षणात रस्त्याच्या रुंदीसह विविध बाबींचा विचार केला जाईल. इमारतीच्या जवळील रस्ते एकमार्गी आहेत की दुहेरीमार्गे आहेत हे देखील निश्चित केलं जाईल. पार्किंगसाठी आकारल्या जाणाऱ्या फीविषयी अधिकाऱ्यांनी चर्चा केली नाही.

मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ डिसेंबर २०२० ते २७ जानेवारी, २०२१ दरम्यान मोटारसायकलींविरोधात अधिकाऱ्यांनी २० हजार ५५६ आणि चार चाकी वाहनांविरूद्ध २५ हजार ४०३ ई-चालान्स जारी केली आहेत.

अधिकाऱ्यांनी असं म्हटलं आहे की, मुंबईत अंदाजे ८० रस्ते पार्किंगची जागा आणि ५० सार्वजनिक पार्किंगची जागा असून त्यातील फक्त ५ टक्के ते वापरतात.

“वाहतूक पोलिस मुंबईतील रस्त्यांवरील बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई करीत आहेत. परंतु काही लोकांनी आम्हाला असं लिहिलं आहे की, त्यांच्याकडे पार्किंगची जागा नाही. आम्ही अशा सोसायट्यांचे सर्वेक्षण करू ज्यांचे रहिवासी आम्हाला या विषयावर माहिती देतील. आणि त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू, ”असं सह पोलिस आयुक्त (वाहतूक) यशस्वी यादव यांनी सांगितलं.



हेही वाचा

जम्बो कोविड सेंटर ३१ मार्चपर्यंत सुरूच राहणार!

मुंबईतल्या ८ डॉक्टरांचा सीरमच्या कोविशिल्ड लसीला नकार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा