Advertisement

कामं वेळेत पूर्ण करा, बक्षिस मिळवा!


कामं वेळेत पूर्ण करा, बक्षिस मिळवा!
SHARES

मुंबई - मेट्रो-2 आणि मेट्रो-7 चे काम मुंबईत सुरू झाले असून येत्या काळात 172 किमीचे मेट्रोचे जाळे मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात उभारले जाणार आहे. अशावेळी मेट्रोच्या कामाचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागू नये आणि काम नियोजित वेळेच्या आधी पूर्ण व्हावे यासाठी एमएमआरडीएने एक अनोखी शक्कल लढवली आहे.

डेडलाइनच्या आधी काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदाराला काम पूर्ण केल्याच्या दिवसापासून डेडलाइनच्या दिवसापर्यंत प्रति दिवस 5 लाख रुपये याप्रमाणे बक्षीस देण्यात येणार आहे. तर डेडलाइननंतर काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांकडून कंत्राटाच्या एकूण रकमेच्या 10 टक्के रक्कम दंडात्मक स्वरुपात वसूल केली जाणार असल्याची माहिती एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त प्रविण दराडे यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिली आहे.

मेट्रो प्रकल्पांसाठी घेण्यात आलेल्या या निर्णयासंबंधीची तरतूद मेट्रोच्या करारात केली असल्याचेही दराडे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान एमएमआरडीएने कंत्राटदारांना बक्षीसाचे लॉलिपॉप दाखवल्याने कंत्राटदार लवकरात लवकर काम पूर्ण करत डेडलाइन पाळण्याचा प्रयत्न करतील अशी आशा यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा