Advertisement

भरमसाठ मुद्रांक शुल्क भरण्याची आता गरज नाही


भरमसाठ मुद्रांक शुल्क भरण्याची आता गरज नाही
SHARES

मुंबई - पुनर्विकासांतर्गत मिळालेल्या हक्काच्या घरात प्रवेश करण्यासाठी रहिवाशांना मुद्रांक शुल्काच्या पोटी दीड ते दोन लाख रुपये मोजावे लागतात. आता मात्र रहिवाशांचे दीड ते दोन लाख रुपये वाचणार असून केवळ शंभर रुपयांत नव्या घरात प्रवेश करता येणार आहे. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने नुकतेच एक परिपत्रक जाहीर केले असून त्यानुसार आता पुनर्विकासातील घरांसाठी, त्यासंबंधीच्या बिल्डर आणि रहिवाशांमधील करारासाठी केवळ 100 रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागणार असल्याचे जाहीर केले आहे.

पुनर्विकासातील घरांसाठी रहिवाशांना मुद्रांक शुल्क भरावे लागते. हे मुद्रांक शुल्क बिल्डरकडून भरले जात असल्याने रहिवाशांचा कॉर्पस फंड कमी होतो. आता मात्र नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागने पुनर्विकासातील रहिवाशांना मोठा दिलासा दिला आहे. यापुढे दीड ते दोन लाखांएवजी केवळ 100 रुपये मुद्रांक शुल्क भरावे लागणार असल्याने दीड ते दोन लाख रुपये वाचणार आहेत. त्यामुळे रहिवाशांचा कॉर्पस फंड वाढेल, अशी माहिती महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश प्रभू यांनी दिली आहे.

मुंबईसह उपनगरात शेकडो इमारतींचा पुनर्विकास सुरू असून या सर्व पुनर्विकासातील रहिवाशांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा