पालिका रुग्णालय ऑक्सिजनवर

गोरेगांव - मुंबई, स्वप्नांची नगरी. पण याच स्वप्न नगरीत आजही असे अनेक भाग आहेत जिथे लोकांना हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध होताना दिसत नाहीये. जिथे हॉस्पिटल आहे तिथे व्यवस्थेचा बोजवारा उडालाय. मुंबईतल्या आरे कॉलनीतल्या रुग्णालयाचीही अशीच अवस्था. हे रुग्णालय आहे की गुरांचा गोठा असा प्रश्न पडतोय. आरे कॉलनीत 27 आदीवासे पाडे असूनही इथल्या नागरिकांच्या आरोग्याची दखल प्रशासन घेताना दिसत नाहीय. रुग्णालयात केवळ एकच बीएमएस डॉक्टर कार्यरत आहेत. त्याच्या मदतीला एक परिसेविका, चार परिचारिका आणि इतर दहा कर्मचारी कार्यरत आहेत. एवढ्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत रुग्णालय 10 ते 4 या वेळेतच खुले असते. त्यामुळे स्थानिक नागरिकांना लांब रुग्णालयामध्ये जावं लागतं.

जिथे मुंबईसारख्या शहरात ही अवस्था असू शकते तिथे खेड्यापाड्यात काय चित्र असू शकतं याचा विचार न केलेलाच बरा. एकीकडे मेरा देश बदल रहा है आगे बढ रहा है च्या जाहिराती झळकताना दिसत आहेत. तर दुसरीकडे सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्य़ा मुंबई पालिकेच्या गोरेगावसारख्या भागात अशी अवस्था. त्यामुळे नेमका देश आणि मुंबई कुणासाठी बदलीय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

 

Loading Comments