समृद्धी महामार्गाच्या शुभारंभाचा मुहूर्त टळणार?


SHARE

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुढील वर्षी जानेवारीत सुरू होणे अपेक्षित होते. मात्र या प्रकल्पासाठी आतापर्यंत केवळ ७.०७ टक्के जमीन ताब्यात घेण्यात आल्याने प्रकल्पाच्या शुभारंभाचा मुहूर्त टाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागा (उपक्रम)चे राज्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नव्याने समृद्धी महामार्ग प्रकल्पाचा कार्यभार सोपवण्यात आलेले भूषण गगराणी यांच्या उपस्तिथीत बुधवारी या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी केवळ ७.०७ टक्के जमीन महामंडळाच्या ताब्यात आल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ जुलै २०१५ रोजी समृद्धी महामार्गाची घोषणा केली होती. हा प्रकल्प येत्या जानेवारी २०१८ मध्ये सुरु होणे अपेक्षित असून, त्यासाठी ४६,००० कोटी रुपयांचा एकूण खर्च प्रस्तावित असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. समृद्धी महामार्ग १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडणार आहे. या महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हे १६ तासांचे अंतर केवळ ९ तासात पूर्ण होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

या प्रकल्पासाठी ४६ हजार कोटी रुपये उभे करण्याचे आव्हान महामंडळापुढे असून, याबाबत प्रयाण केले जात असल्याची माहिती या प्रकल्पाचे प्रमुख भूषण गगराणी यांनी सांगितले. यासंदर्भात देशातील राष्ट्रीयकृत बँकांशी बोलणी सुरु आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच केलेल्या दक्षिण कोरियाच्या दौऱ्यात निधी उभारण्याबाबत सकारात्मक बोलणी झाल्याचे गगराणी यांनी सांगितले.हेही वाचा -

समृद्धी महामार्ग: ऑक्टोबरला काम सुरू, 2020 ला मुंबई-नागपूर 8 तासांतडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय