Advertisement

पुनर्वसनासाठी रहिवाशांचे विमानतळासमोर आंदोलन


पुनर्वसनासाठी रहिवाशांचे विमानतळासमोर आंदोलन
SHARES

विलेपार्ले - न्या. एम. सी. छगला मार्गावरील संजय गांधी नगर येथील विमानतळ परिसरातील रहिवाशांनी पुनर्वसनाच्या मागणीसाठी डोमेस्टिक विमानतळासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. सहा दिवस हे आंदोलन सुरू राहणार आहे. एमएमआरडीएने याची दखल न घेतल्यास शनिवारपासून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा विमानतळ परिसर रहिवाशी एकता संघाने दिला आहे. 

या धरणे आंदोलनात विमानतळ परिसर रहिवासी एकता संघाचे अध्यक्ष अॅड. सुभाष गायकवाड, उपाध्यक्ष उत्तम ससाणे, सचिव सुंदर पाडमुख, सहसचिव शिवानंद पोस्थे यांच्यासह शेकडो रहिवासी सहभागी झाले होते.

22 जुलै 2014 ला उड्डाण मंत्रालय भारत सरकार अशोक गजपती राजू यांनी मुंबई विमानतळालगतच्या झोपडंपट्ट्यांचे पुनर्वसन करण्याचे पत्र महाराष्ट्र शासनाला पाठवले होते. त्या पत्रात राहत्या जागेत झोपड्यांच्या पुनर्वसनाला मान्यता देण्यात आली. सोबतच 500 चौरस फूट घरं प्रत्येक झोपडीधारकाला देण्यात यावी, असे जाहीर केले होते. तसे असताना राज्य सरकारने केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार पुनर्वसन योजनेची अंमलबजावणी केली नाही, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. 

महाराष्ट्र सरकारने जर केंद्र शासनाच्या पत्राची अंमलबजावणी न करता गळचेपी धोरण अवलंबल्यास 90 हजार झोपडीधारक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा विमानतळ परिसर रहिवासी एकता संघाचे सचिव सुंदर पाडमुख यांनी दिला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा