Advertisement

सिम्प्लेक्स करणार मेट्रो-2मधील 11 स्थानकांची उभारणी


सिम्प्लेक्स करणार मेट्रो-2मधील 11 स्थानकांची उभारणी
SHARES

मेट्रो 2 ब अर्थात डीएननगर ते मानखुर्द या 23.5 किमी लांबीच्या मेट्रो मार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या निविदेत अखेर मे. सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चरने बाजी मारली आहे. मेट्रो-2 ब च्या पहिल्या टप्प्यातील बांधकामासाठी आणि संकल्पचित्र (डिझाइन) साठीच्या निविदा सोमवारी खुल्या करण्यात आल्या. त्यानुसार निविदा अंतिम करत सिम्प्लेक्सला हे कंत्राट देण्यात आल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून जाहीर करण्यात आले आहे.


मेट्रो-2 मध्ये 22 स्थानकांचा समावेश

23.5 किमीच्या मेट्रो-2 मध्ये एकूण 22 स्थानकांचा समावेश आहे. त्यानुसार दोन टप्प्यांमध्ये मेट्रो मार्ग आणि स्थानकांचा विकास केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील एसिकनगर, प्रेमनगर, इंदिरानगर, ओल्ड एअरपोर्ट, खिरानगर, सारस्वतनगर, वांद्रे पश्चिमेकडील नॅशनल कॉलेज, एमएमआरडीए कार्यालय, इन्कमटॅक्स आणि बीकेसी या 11 स्थानकांसाठी काही दिवसांपूर्वी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यात सिम्प्लेक्सने बाजी मारली. त्यामुळे आता या 11 स्थानकांचे डिझाईन तयार करण्यासह स्थानकांचे बांधकाम सिम्प्लेक्स करणार आहे.


दुसऱ्या टप्प्यात 11 स्थानकांचे बांधकाम

दुसऱ्या टप्प्यात एमटीएनएल, एस. जी. बर्वे मार्ग, कुर्ला टर्मिनस, कुर्ला(पू), पूर्व द्रुतगती महामार्ग, डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल, मानखुर्द, मंडाले या 11 स्थानकांचे बांधकाम दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. त्यानुसार आता लवकरच दुसऱ्या टप्प्याची निविदा प्रक्रियाही लवकरच पूर्ण करण्यात येण्याची शक्यता आहे.



हेही वाचा - 

अखेर मेट्रोसाठीचं पहिलं टीबीएम मशिन मुंबईच्या पोटात शिरलं!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा