Advertisement

शिवडीतील परवडणाऱ्या घरांच्या आरक्षणावरून ट्रान्स हार्बर फिरणार!

शिवडीतील तब्बल १० हेक्टर जागेवर असलेले विशेष औद्योगिक वापराचे आरक्षण बदलून आता त्या जागेवर शिवडी इंटरचेंजसाठी 'ट्रान्सपोर्टेशन झोन' म्हणून आरक्षण टाकण्यात येत आहे. सरकारने अशाप्रकारची सूचनाच जारी केली असून, विकास नियोजन विभागाकडून पुढील कार्यवाहीला सुरुवातही झाली आहे.

शिवडीतील परवडणाऱ्या घरांच्या आरक्षणावरून ट्रान्स हार्बर फिरणार!
SHARES

मुंबईच्या नव्या विकास आराखड्यात औद्योगिक क्षेत्रातील काही जागांमध्ये परवडणारी घरे बांधण्यासाठी महापालिकेने टाकलेल्या आरक्षणात आता सरकाकडून बदल केला जात आहे. शिवडीतील तब्बल १० हेक्टर जागेवर असलेले विशेष औद्योगिक वापराचे आरक्षण बदलून आता त्या जागेवर शिवडी इंटरचेंजसाठी 'ट्रान्सपोर्टेशन झोन' म्हणून आरक्षण टाकण्यात येत आहे. सरकारने अशाप्रकारची सूचनाच जारी केली असून, विकास नियोजन विभागाकडून पुढील कार्यवाहीला सुरुवातही झाली आहे.


सहा भूखंडांवर होतं आरक्षण

शिवडी येथील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीच्या सहा भूखंडांवर मागील विकास आराखड्यात कोणतेही आरक्षण नव्हते. परंतु, हा पट्टा औद्योगिक क्षेत्रात मोडतो. नव्या २०३४च्या विकास आराखड्यात या भूखंडांपैकी काही भूखंडांवर उद्यान, बगीचे तसेच परवडणारी घरे असे आरक्षण टाकण्यात आले आहे. हे सर्व भूखंड औद्योगिक व निवासी पट्ट्यात मोडतात. सध्या हा आराखडा अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे असून याबाबत हरकती व सूचना जाणून घेण्यासाठी शासनाने समिती गठित केली आहे. त्यानुसार हा आरक्षण बदलाचा निर्णय सरकारने घेतला आहे.


मुंबई पोर्ट ट्रस्टने सादर केलेल्या नकाशानुसार 'पोर्ट ऑपरेशनल एरिया' आणि 'वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट झोन' असे दोन नवीन पट्टे तयार करण्यात आले आहेत. जे भाग समुद्रालगत नाहीत, ते भाग 'वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट झोन'मधून वगळण्यात आले. या दोन भागांकरता २०१४-३४च्या विकास नियंत्रण नियमावली लागू करण्यात आल्या आहेत. आरक्षण फेरबदल हा निवासी पट्ट्यात मोडत असून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या परवानगीने महापालीकेचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

संजय दराडे, प्रमुख अभियंता, विकास नियोजन विभाग


हार्बर लिंकसाठी भूखंड आवश्यक

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी एमएमआरडीएवर सोपवली आहे. त्यामुळे त्यांनी हे भूभाग ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे विकास आराखड्यात शिवडी इंटरचेंज करता 'ट्रान्सपोर्टशन झोन' म्हणून आरक्षित करून फेरबदल करण्याची सूचना सरकारने केली आहे.



हेही वाचा

MTHL प्रकल्पाच्या निविदेत चीनी कंपन्यांना 'नो एन्ट्री'

सुस्साट वेगात बदलणार मुंबई!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा