हॉटेल, रेस्टॉरंटमधली स्वच्छतागृह सार्वजनिक होणार ?

मुंबई - दक्षिण दिल्ली नगरपालिकेने एक नवा नियम अंमलात आणला आहे. या नियमानुसार खासगी हॉटेल आणि रेस्टॉरंटचं स्वच्छतागृह सामान्य नागरिकांनाही वापरता येणार आहे. 'पे अॅण्ड युज’ यानुसार ही स्वच्छतागृह वापरता येणार आहे. त्यामुळे आता दिल्लीनंतर मुंबईतही हा नियम लागू करावा अशी मागणी होताना दिसतेय. 

जर मुंबईत हा नियम अंमलात आला, तर मुंबईतील महिला हा निर्णय स्विकारातील का? की सरकारकडे सार्वजनिक स्वच्छतागृहाची मागणी करतील. हेच आम्ही मुंबई बोले तो च्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यात महिलांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. पण, सुरक्षेच्या माध्यमातूनही विचार करायला हवा अशी मागणी या वेळी स्त्रियांनी केली.

Loading Comments