Advertisement

यू मुंबाच्या कर्णधारपदी फझल अत्राचली याची निवड

सातव्या हंगामासाठी यू मुंबानं बुधवारी कर्णधारपदाची घोषणा केली. यंदा संघाचं नेतृत्व फझल अत्राचलीकडं असणार आहे. तसंच, सातव्या हंगामातील सलामीचा सामना यू मुंबा विरुद्ध तेलुगू टायटन्स यांच्यात होणार आहे.

यू मुंबाच्या कर्णधारपदी फझल अत्राचली याची निवड
SHARES

आयपीएलच्या हंगामानंतर आता सर्वांना प्रो कबड्डीची उत्सुकता लागून राहिली आहे. यंदा २० जुलैपासून प्रो कबड्डी लीगच्या ७ व्या हंगामाला सुरूवात होणार आहे. या सातव्या हंगामासाठी यू मुंबानं बुधवारी कर्णधारपदाची घोषणा केली. यंदा संघाचं नेतृत्व फझल अत्राचलीकडं असणार आहे. तसंच, सातव्या हंगामातील सलामीचा सामना यू मुंबा विरुद्ध तेलुगू टायटन्स यांच्यात होणार आहे.

उत्तम कामगिरीची प्रेरणा

यंदा यू मंबा संघाचा कर्णधार फझल अत्राचली असून, संदीप नरवाल उपकर्णधार आहे. कर्णधारपदी निवड झाल्यानंतर फझल अत्राचलीनं 'आनंद झाला आहे' असं म्हणत, 'या जबाबदारीमुळं मला उत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाली’, असंही म्हटलं.

यू मुंबाचे खेळाडू

  • चढाईपटू : अभिषेक सिंग, अर्जुन देश्वास, अतुल एमएस, डाँग जीओन ली, गौरव कुमार, नवनीत, रोहित बलियान, विनोथ कुमार.
  • बचावपटू : राजगुरु सुब्रमनियम, हर्ष वर्धन, अनील, हरेंद्र कुमार, यंग चँग को, फजल अत्राची, सुरेंद्र सिंग.
  • अष्टपैलू : अजिंक्य कापरे, मोहित बलयान, संदीप नरवाल.

यू मुंबाचे सामने

तारीख
सामने
२० जुलै
यू मुंबा वितेलुगू टायटन्स
२२ जुलै
यू मुंबा विजयपूर पिंक पँथर्स
२७ जुलै
यू मुंबा वि. पुणेरी पलटन
२८ जुलै
यू मुंबा विबंगळुरू बुल्स
३१ जुलै
यू मुंबा वियूपी योद्धा
२ ऑगस्ट
यू मुंबा विगुजरात सुपरजायंट्स
९ ऑगस्ट
यू मुंबा विबंगाल वॉरियर्स
१६ ऑगस्ट 
यू मुंबा विपाटणा पायरेट्स
१९ ऑगस्ट
यू मुंबा विहरयाणा स्टीलर्स
२३ ऑगस्ट
यू मुंबा वि. तमीळ थलायवाज
२८ ऑगस्ट
यू मुंबा विदबंग दिल्ली
३१ ऑगस्ट
यू मुंबा विजयपूर पिंक पँथर्स
५ सप्टेंबर
यू मुंबा विपुणेरी पलटन
११ सप्टेंबर
यू मुंबा विबंगाल वॉरियर्स
१३ सप्टेंबर
यू मुंबा वितेलुगू टायटन्स
१८ सप्टेंबर
यू मुंबा वियूपी योद्धा
२२ सप्टेंबर
यू मुंबा विगुजरात फॉर्च्युनजायंट्स
२७ सप्टेंबर
यू मुंबा बंगळुरु बुल्स
३० सप्टेंबर
यू मुंबा वितमीळ थलायव्हाज
२ ऑक्टोबर
यू मुंबा विपाटणा पायरेट्स
१० ऑक्टोबर
यू मुंबा विहरयाणा स्टीलर्स
११ ऑक्टोबर
यू मुंबा विदिल्ली दबंग




हेही वाचा -

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला अटक

१५ दिवसांत कर्जमाफीच प्रकरणं निकाली काढा, उद्धव ठाकरेंचं विमा कंपन्यांना अल्टिमेटम




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा