आ'स्वाद'ची 31 वर्ष

  मुंबई  -  

  दादर - झणझणीत मिसळ, चविष्ट कोथिंबीर वडी, थालिपीठ, वडापाव, उपवासाचे पदार्थ...नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल तुमच्या. शिवाजी पार्क परिसरात 1986 पासून आस्वाद हॉटेल अस्सल मराठमोळे पदार्थ पुरवून खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवत आहे. तिथले पदार्थ खाण्यासाठी खवय्ये अगदी दूरवरून येतात. अगदी हॉटेलबाहेर रांगा लावतात.

  1986 मध्ये सुरू करण्यात आलेल्या आस्वादला नुकतीच 31 वर्ष पूर्ण झाली. या 31 वर्षात आस्वादचा स्वाद कायम आहे. खास मराठमोळे पदार्थ खवय्यांना खायला मिळावेत यासाठीच आस्वाद हॉटेल सुरू केले. सूर्यकांत सरजोशी यांचे वडील श्रीकृष्ण सरजोशी यांनी उभारलेल्या परंपरागत मराठमोळ्या हॉटेलला त्यांचे पुत्र सूर्यकांत सरजोशी यांनी नवे रूप दिले.

  1996 मध्ये हॉटेल आणखीन विस्तारले. 2006 मध्ये सूर्यकांत यांनी त्याला एसी हॉटेलचे रूप दिले. सुरुवातीला मराठमोळे पदार्थ या हॉटेलमध्ये चाखता येत होते. पण 1996 मध्ये साऊथ इंडियन पदार्थ, फास्ट फूडही हॉटेलमध्ये खवय्यांसाठी उपलब्ध झाले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.