Advertisement

मुंबईतल्या 'या' ५ ठिकाणी करा प्री-वेडिंग फोटोशूट

डिसेंबर महिन्यात तर लग्नांचा धुमधडाकाच असतो. मला खात्री आहे तुम्ही देखील प्री वेडिंग फोटोशूटसाठी जागेच्या शोधात असाल. मग आम्ही तुम्हाला फोटोशूटसाठी ५ ठिकाणं सुचवणार आहोत.

मुंबईतल्या 'या' ५ ठिकाणी करा प्री-वेडिंग फोटोशूट
SHARES

मागील काही वर्षात लग्नासोबतच प्री वेडिंग फोटोशूटचा ट्रेंड कमालीचा प्रसिद्ध झाला आहे. लग्नाआधी एखाद्या मस्त रोमँटिक ठिकाणी जाऊन फोटो शूट करताना, वेगवेगळ्या थीम, कपडे, ट्रेंडी जागा याकडे बारकाईनं लक्ष दिलं जातं. साधारणतः या शूटसाठी एखादी जुनी वास्तू, समुद्र किनारा, जंगल, अशा ठिकाणांना अधिक पसंती दिली जाते.

डिसेंबर महिन्यात तर लग्नांचा धुमधडाकाच असतो. मला खात्री आहे तुम्ही देखील प्री वेडिंग फोटोशूटसाठी जागेच्या शोधात असाल. मुंबईतच पण एखादं चांगलं आणि कमी खर्चिक ठिकाण तुम्हाला हवंय? मग तुमचं हे टेंशन आम्ही दूर करतो आणि तुम्हाला एक से एक चांगली ठिकाणं सुचवतो.


१) फोर्ट

मुंबईतील टाऊन एरिया म्हणजेच सीएसटी किंवा फोर्टमध्ये तुम्ही प्री-वेडिंग वीकेंडला प्लॅन करू शकता. इतर ठिकाणांच्या मानानं इथं तशी गर्दी आणि ट्राफिक कमी असते. त्यामुळे इथल्या अनेक ऐतिहासिक आणि व्हिटेंज लुक असणाऱ्या मुंबईतील लँडमार्क्ससमोर तुम्ही प्री-वेडिंग फोटोशूट करू शकता.

अनेक बॉलीवूड चित्रपटात दिसलेली एशियाटीक लायब्ररी. ज्याच्या पायऱ्यावर तुम्हाला छान बॅकग्राऊंड मिळेल.


२) वर्सोवा बीच

मुंबईतील प्रसिद्ध बीच म्हणजे वर्सोवा. अफरोज शहानं सुरू केलेल्या स्वच्छता अभियानामुळे हा बीच पुन्हा एकदा छान दिसू लागला आहे. मग पहाटे लवकर, संध्याकाळी किंवा अगदी रात्री उशिरा पोहचून तुम्ही एखादं हटके थीम फोटोशूट करू शकता.


म्हणजे तुम्हाला गर्दीचा त्रासही होणार नाही. मस्त समुद्रकिनारा उगवणारा किंवा मावळता सूर्य आणि सोबतीला ती असं फोटोशूटही तुम्ही करू शकता.


    ३) बँड स्टँड

    जर तुम्हाला फक्त खळाळता समुद्र आणि खडक असा नजारा हवा असेल तर बेस्ट ठिकाण म्हणजे रॉकी बीच असलेलं बँड स्टँड.


    इथं जुन्या पद्धतीचे लँपपोस्ट, बँचेस, भिंती आणि सी स्केप आहे. त्यामुळे इथे तुम्ही मस्तपैकी रोमँटीक आणि क्लासिक थीममधील प्री-वेडिंग फोटोशूट करू शकता.


    ४) संजय गांधी नॅशनल पार्क

    जर तुम्ही अगदी पावसाळा संपताना आणि थंडीच्या सुरू होण्याआधी शूट करणार असाल तर निसर्गाचं वरदान लाभलेल्या नॅशनल पार्कमध्येही शूट करू शकता.

    तुम्ही जर पर्यावरणप्रेमी असाल तर यासारखी सुंदर जागा तुम्हाला मुंबईत क्वचितच मिळेल. कारण मुंबईच्या कुशीत वसलेलं हे हिरवंगार ठिकाण तुमच्या प्री-वेडिंगसाठी अगदी परफेक्ट आहे.

    ५) वसईचा किल्ला

    दक्षिण मुंबईतील गजबज किंवा गर्दीची ठिकाणं टाळायची असतील तर तुमच्यासाठी बेस्ट पर्याय म्हणजे वसईचा किल्ला. इथे तुम्ही शांततेत तुम्हाला हवं तसं पोज करू शकता.

    तुम्ही जर गेम ऑफ थ्रोन्सचे फॅन असाल तर ती थीम ठेवूनही इथे तुम्ही प्री-वेडिंग करू शकता किंवा अगदी शिवकालीन थीम ठरवून पारंपारिक वेषातही शूट करू शकता.

    कव्हर फोटो


    हेही वाचा

    हनिमूनसाठी 'या' ५ ठिकाणी भेट द्या आणि मनसोक्त लुटा आनंद


    संबंधित विषय
    Advertisement
    ‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा