Advertisement

'या' ५ ठिकाणी भेट द्या आणि मनसोक्त आनंद लुटा

आज आम्ही तुम्हाला अशाच काही जागांची माहिती देणार आहोत जिथे तुम्ही कुटुंबियांसोबत आनंदाचे काही क्षण घालवू शकता.

'या' ५ ठिकाणी भेट द्या आणि मनसोक्त आनंद लुटा
SHARES

दैनंदिन कामात आपण प्रचंड व्यस्त असतो. कामाच्या व्यापात कुटुंबियांसोबतच मित्र-मैत्रिणींसोबतही वेळ घालवायला वेळ नसतो. पण चार-पाच दिवसांची सुट्टी प्लॅन करून एका छोट्या ट्रिपला जाऊ शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही जागांची माहिती देणार आहोत जिथे तुम्ही कुटुंबियांसोबत आनंदाचे काही क्षण घालवू शकता.


) वायनाड, केरळ

जंगल, वाइड लाइफ आणि पर्वतरांगांनी सजलेलं केरळमधील वायनाड सुंदर हिल स्टेशन आहे. इथं चेंबरा पीक, एडक्कल गुफा, वायनाड वन्यजीव अभयारण्य, सुल्तान बाथरी, थिरुनेली मंदिर, अंबुकुथी माला आणि कुरुवद्वीप या ठिकाणी फिरू शकता. बर्डवॉचिंग, कॉफीच्या बागा याचा देखील आनंद घेऊ शकता.

 

) हम्पी, कर्नाटक 

युनेस्कोनं जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आलेलं हम्पी फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. तीन दिवसीय आयोजित हम्पी फेस्टिव्हलला देखील तुम्ही नोव्हेंबरमध्ये भेट देऊ शकता. पुरात्व संग्रहालय, विजया विठ्ठल मंदिर, हनुमान मंदिर, राणी स्नान, शाही सलग्न, हम्पी बाजार या ठिकाणी जाऊ शकता.


) अल्मोंडा, उत्तराखंड

हिमालयाच्या कुशीत कश्यप पर्वत रांगांमध्ये पसरलेले हिल स्टेशन आहे. इथं कासर देवी, मंदिर, कटारमल सुर्य मंदिर, बिनसर वन्यजीव अभ्यारण्य प्रसिद्ध आहेत. याशिवाय वॉकिंग. ट्रेकिंग, सन सेट आणि सन राईजचा देखील तुम्ही आनंद घेऊ शकता.

) लडाख

बर्फाळ वातावरण, गोठलेली सरोवरे, रंगीबेरंगी गार्डन्स आणि प्राचिन बौद्ध लेण्यांचा खजिना म्हणजे लेह आणि लडाख. वसंत ऋतूमध्ये इथलं वातावरण तुम्हाला एक सुखद अनुभव देईल. रायसी फोर्ट, रॉयल पॅलेस, प्यांग, लिकिर, स्पिटुक, थिक्से अशा मॉनेस्ट्रीज (मठ) येथे आहेत. हे प्राचीन बौद्ध मठ पाहताना एका गूढ विश्वात आपण जातो. मॅग्नेटिक हिल, पँगाँग सरोवर, नुब्रा व्हॅली, शेय मॉनस्ट्री पाहता येईल.


) बूंदी, राजस्थान

अरवली पर्वत आणि झऱ्यांच्या मध्ये बूंदी हे छोटेसे ठिकाण प्रसिद्ध आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आयोजित बूंदी महोत्सवात हजारो नागरिक येतात. इथलं गढ पॅलेस, तारागढ पॅलेस, नवल सागर झऱ्याला देखील भेट देऊ शकता.





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा