Advertisement

माश्यांच्या 800 प्रजाती मत्स्यप्रेमींच्या भेटीला


माश्यांच्या 800 प्रजाती मत्स्यप्रेमींच्या भेटीला
SHARES

माटुंगा - देशातील विविध भागांमध्ये गेल्या सहा वर्षांमध्ये यशस्वीपणे प्रदर्शनांचे आयोजन केल्यानंतर 'अँक्वा लाईफ' पुन्हा एकदा मुंबईत दाखल होत आहे. या वेळी पाण्यातील विविध जाती आणि समुद्रीय प्राण्यांच्या सर्वाधिक प्रजाती प्रदर्शनात असणार आहेत. लौकीक क्रीएशन्सच्या माध्यमातून हे प्रदर्शन माटुंगा पूर्व येथील पोद्दार कॉलेज ऑफ कॉर्मस अँड इकॉनॉमिक्स, माटुंगा मॅन्शन येथे 8 ते 12 ऑक्टोबर 2016 रोजी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.

प्रदर्शनात 200 हूनही अधिक फिश टँक असतील आणि 800 च्या वर माशांच्या प्रजाती प्रदर्शनात मांडल्या जातील. प्रदर्शनात जिवंत प्रवाळ मांडले जाणार असून भारतात अशाप्रकारे पहिलेच प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. या वेळी ज्या दुर्मिळ जाती प्रदर्शनात असतील, त्यात ट्रिगर फिश, लायन फिश, पिवळ्या शेपटीचे डॅमसेल्स, निळे डॅमसेल्स, माता टँक, ग्रीन विंग सार्जंट, मून रेस, चेकर बोर्ड रेस, सोनेरी डोक्याचा गोबी, मूरीश आयडॉल, व्हीम्पल, ब्ल्यूरिंग एंजल, कुराण एंजल, ब्राऊन इल, क्लाऊन फिश, स्टोन फिश, बॅट फिश, फायर क्लाऊन आणि यलो बटरफ्लाय चेकरड बार्ब, मोनो सेबाई, अँगोलन एलिफंट नोज, रॉयाल फलरेवेल्ला आणि बलुन ड्वार्फ आदी प्रजातींचा समावेश आहे.

प्रदर्शनासाठी प्रतापगडची प्रतिकृती साकारण्यात आली असून, या प्रतिकृतीमध्ये मासे सोडले जाणार आहेत. या माशांच्या प्रत्येक प्रजातीला चारही बाजूने मत्स्यप्रेमींना पाहता येईल अशी रचना करण्यात येणार आहे. गडाची माहिती, जिवंत देखावा लोकांसमोर यावा, या हेतूने हि कलाकृती साकारण्यात येणार असल्याची माहिती लौकीक क्रीएशन्स या संस्थेकडून देण्यात आली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा