Advertisement

बाईकवर आख्खा देश फिरणारा मुंबईचा पोलीस!


SHARES

पोलिसांना खेळाची, ट्रेकिंगची हौस असते हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण आज आम्ही तुमची ओळख एका अशा अवलिया पोलीस अधिकाऱ्याशी करून देत आहोत, ज्याने एकट्याने आपल्या बाईकवर संपूर्ण देशाची सफर केली आहे. निखिलेश यादव असे त्याचे नाव आहे. आपल्या 105 दिवसांच्या सफरीत निखिलेशने तब्बल 30 हजार किलोमीटर प्रवास करून भारतातील 29 राज्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशांना भेट दिली आहे.

असा केला राज्यांचा प्रवास -
21 जानेवारी 2017 ला निखिलेश यादवच्या या अभूतपूर्व सफरीला सुरूवात झाली. वरळी येथील एलए 3 च्या आपल्या कार्यालयातूनच निखिलेशने सफरीला सुरूवात केली. पहिल्या टप्प्यात गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणामार्गे छत्तीसगढ राज्याची वारी करून तो उत्तरेकडे गेला. त्यानंतर पंजाब, हरयाणामार्गे त्याने जमू-काश्मीर गाठले. तेथून खाली उतरत उत्तर प्रदेश करत पूर्वेकडच्या राज्यांकडे त्याने आपला मोर्चा वळवला. तेथून तो कोलकात्याला आला आणि पुढे दक्षिणेकडील राज्यांची सफर करत गोवा, कोकण आणि पुन्हा महाराष्ट्रात येऊन दाखल झाला.

वरळी मुख्यालयाचे तत्कालीन उपायुक्त संजय पाटील यांना पोलीस दलातील कर्तव्याव्यतिरिक्त भटकंती, गिर्यारोहण, प्राणी-पक्षी निरीक्षण आणि संवर्धन, संकेतस्थळ डिझायनिंग या क्षेत्रात विशेष रस असल्याची माहिती होती. मुळात लक्ष्मीनारायण यांनीच एकदा त्यांच्या सहकाऱ्यांना कर्तव्याव्यतिरिक्त काय करता असे विचारले होते. त्यामुळेच आपण इच्छा व्यक्त करताच वरिष्ठांनी प्रोत्साहन दिले.

 - निखिलेश यादव

बाईक कम्युनिटीने केली मदत -
विशेष म्हणजे निखिलेश एकटाच सफरीवर निघाला होता. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे व्यवस्थापन त्याला एकट्यालाच करायचे होते. सफरीचा मार्ग, जेवणापासून ते रात्रीच्या राहण्याची व्यवस्था करणे त्याला एकट्यालाच भाग होते. अशा वेळी त्याला मदत केली ती ठिकठिकाणच्या बाईक कम्युनिटीने. या कम्युनिटीने त्याला सोबत तर दिलीच, पण त्याचा प्रवासही सुखकर बनवला. मे महिन्यात आपल्या मॅरेथॉन सफरीनंतर निखिलेश घरी परतला आहे. केवळ आपल्या बाईकवर संपूर्ण देश पादाक्रांत करणाऱ्या निखिलेशला 'मुंबई लाइव्ह'च्या शुभेच्छा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा