पैशात पैसे ठेवायचे पाकीट

  Goregaon
  पैशात पैसे ठेवायचे पाकीट
  मुंबई  -  

  गोरेगाव - नवनव्या डिझाईन्स, विविध आकार आणि रंगामध्ये हल्ली बाजारात पाऊच आणि पाकीट मिळतात. मात्र मुंबईत तर चक्क पैशांमध्ये पैसे ठेवण्याचे एक पाकीट मार्केट मध्ये उपलब्ध झाले आहे. मुंबईत नोटा आणि नोटाचे बंडल रस्त्यावर, पादचारी पुलावर,रेल्वेच्या डब्यात, स्टेशन बाहेर मिळत आहेत. त्यामुळे नोटाचा पाऊस पडला आहे की काय असे मनात येते आणि ती नोट बघण्यासाठी लक्ष आपचुकच वेधले जात आहे. आश्चर्य वाटले ना ! गोरेगाव मध्ये आपल्याला सर्व ठिकाणी बघायला मिळतील या नोटा. खरं तर या नोटा म्हणजे पैसे ठेवण्यासाठी असणारे पाकीट आहे, जे दिसायला हुबेहूब १००, ५००, १००० रूपयांच्या नोटांसारखे आहे. साहजिकच त्यामुळे लोकांचे लक्ष वेधले जाते. विक्रेत्यांनी या पाकिटाची किंमत २० रुपये इतकी रास्त ठेवली आहे. या पाकीटाला एकच कप्पा आहे, त्यात आपण फक्त पैसे ठेवु शकतो ५०० ची नोट ठेवायला ५०० चे पाकीट आणि १००० ची नोट ठेवायला १००० चे पाकीट उपलब्ध आहे. या मेड इन चायना नोटा लोक मजेने खरेदी करत आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.