चेंबूरमधील साई वडापाववाल्याची चवच भारी


  • चेंबूरमधील साई वडापाववाल्याची चवच भारी
SHARE

चेंबूर-मुंबईची खासियत आणि निराधारांच्या पोटाची भूक भागवणारा वडापाव..लाल खोबऱ्याची चटणी, हिरवी चटणी आणि सोबतीला झणझणीत मिरची..हा..हा..असं बोललं तरी तोंडाला पाणी सुटतं. असाच एक फेमस वडापाव आहे, तो चेंबूरच्या टिळकनगर परिसरातल्या साई वडापाव सेंटरचा. छोट्याशा गाडीवर शैलेश सकपाळ यांनी या वडापावची सुरुवात केली आणि आता संपूर्ण सकपाळ कुटुंब हे 35 वर्षापासून वडापाव विकण्याचा व्यवसाय करतं. जरी गाडीवर हे वडापाव तयार होत असले तरी उत्तम क्वॉलिटी आणि स्वच्छता राखण्याचा यांचा हातखंडा आहे. 35 वर्षांपासून त्यांनी वडापावची चव कायम ठेवलीय. हा वडापाव खाण्यासाठी चेंबूरसह, घाटकोपर परिसरातले खवय्ये गर्दी करतात. जर कधी चेंबूरला फिरायला म्हणून गेलात तर साई वडापाव नक्की खा.

संबंधित विषय
ताज्या बातम्या