Advertisement

व्हेज शूज...


व्हेज शूज...
SHARES

कांदिवली – नॉनव्हेज न खाणाऱ्या मुंबईकरांसाठी शिंदे शूज यांनी एक भन्नाट कल्पना बाजारात आणलीये. चामड्याला (लेदर) पर्याय म्हणून सिन्थेटिक मटेरियल वापरून तयार केलेले 'व्हेज शूज' त्यांनी तयार केलेत. दिसायला अगदी हुबेहूब लेदर शूज सारखे असले तरी हे व्हेज शूज किफायतशीरही आहे. 899 रूपयांपासून ते 1599 रूपयांपर्यंत हे शूज ग्राहकांना घेता येतील. या बुटांसाठी 'पीयु' सोल वापरला असल्यामुळे ते गरमही होत नाहीत. गुजराती, जैन आणि इतर शाकाहारी मंडळी तसंच प्राणीमित्र ज्यांना लेदर शूज वापरायचे नाहीत, त्यांच्यासाठी व्हेज शूज हा एक उत्तम पर्याय ठरेल, असं शिंदे शूजचे मालक सचिन शिंदे यांनी मुंबई लाइव्हला सांगितलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा