Advertisement

नेलपॉलिशचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

नेलपॉलिश हातांची सुंदरता तर वाढवतेच, पण तुम्हाला माहित आहे का? नेलपॉलिश इतर कामांसाठी देखील वापरली जाते. आता अशी कोणती कामं आहेत ज्यात नेलपॉलिशचा वापर होतो? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. अशा काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

नेलपॉलिशचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
SHARES

नेलपॉलिश हातांची सुंदरता तर वाढवतेच, पण तुम्हाला माहित आहे का? नेलपॉलिश इतर कामांसाठी देखील वापरली जाते. आता अशी कोणती कामं आहेत ज्यात नेलपॉलिशचा वापर होतो? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. अशा काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.



  • अनेकदा सुईमध्ये दोरा ओवणं म्हणजे मोठी कसरत असते. पण नेलपॉलिशच्या वापरानं तुम्ही सहज सुईमध्ये दोरा ओवू शकता. यासाठी दोऱ्याच्या टोकाशी नेलपॉलिश लावा. जेव्हा नेलपॉलिश सुकेल आणि दोरा कडक होईल तेव्हा दोरा सहज सुईमध्ये जाईल.
  • स्क्रू लावायचा आहे पण तो लूज झाला आहे. अशा वेळी स्क्रू ट्रान्सपरंट नेलपॉलिशमध्ये डिब करावा. स्क्रू कितीही जुना असला, तरी सहज फिट होईल.



  • नट बोल्ट, स्क्रू किंवा खिळ्यांना गंज लागू नये म्हणून नेलपॉलिशचा वापर करावा. फर्निचरवर लावलेल्या सर्व नट बोल्ट आणि स्क्रूवर मॅचिंग नेलपॉलिशचा एक कोट करा.
  • घरातल्या बेडरूम, कपाट यांच्या किल्ल्या सेम असल्यानं लक्षात राहात नाहीत. कोणती चावी कशाची आहे, यात खूप कन्फ्यूजन असतं. अशा वेळी नेलपॉलिशचा वापर करून चाव्या वेगवेगळ्या कलरनं हायलाईट करू शकता!



  • आर्टिफिशियल ज्वेलरी किंवा बेल्टचा बक्कल वेळेसोबत खराब किंवा काळा पडतो. अशा वेळी ट्रान्सपरंट नेलपॉलिशचा सिंगल कोट लावावा.
  • नेकलेस आणि झुमके घालायला आवडतात? पण त्यामुळे अॅलर्जी होते. चिंता नको. नेकलेसचा मागचा भाग नेलपेंटने रंगवा. त्यामुळे अॅलर्जी होणार नाही.
  • वुड फ्लोअरवर स्क्रॅच चांगले दिसत नाही. हे स्क्रॅच लपवण्यासाठी मॅचिंग नेलपॉलिशचा वापर करा. याचा कोट करून सुकू द्या आणि सँड पेपरनं फिनिशिंग करा.
  • अंधारात रिमोट ऑपरेट करायला त्रास होतो. वेगवेगळ्या ब्राईट कलर्सच्या नेलपॉलिशचा वापर करून रिमोटच्या बटणांवर अप्लाय करा. यामुळे अंधारात रिमोट कंट्रोल ऑपरेट करता येईल.
  • लग्नासमारंभाला किंवा वाढदिवसाला देण्यात येणारा लिफाफा चिकटवण्यासाठी फेविकॉल सापडत नाही. अशा वेळी ट्रान्सपरंट नेलपॉलिशचा वापर करू शकता.
  • बाथरूममध्ये ठेवलेले स्टीलचे प्रोडक्ट पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे गंजू लागतात. हे टाळण्यासाठी त्या वस्तूंना ट्रान्सपरंट नेलपॉलिश कोटिंग करा.
  • बुटाची लेस सारखी सुटते म्हणून त्रास होतो. सुकलेल्या नेलपेंटने लेस रंगवून टाका. त्यामुळे लेस वारंवार सुटणार नाही आणि रंगीबेरंगी लेस दिसायला ही छान दिसतील.
  • शर्टाची सफेद रंगाची बटणं नेलपेंटने रंगवा. चांगला लूक येईल.
  • सँडलचा सोल खराब झालाय म्हणून सँडल पडून आहे. मग सँडलचा सोल नेलपेंटने रंगवा. सोल पुन्हा नव्यासारखे दिसतील.



हेही वाचा

तृतीयपंथींचं 'तिसरं' जग..थर्ड आय कॅफे!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा