Advertisement

'या' नावाजलेल्या कंपनीच्या लोगोमध्ये दडलेत अनेक अर्थ


'या' नावाजलेल्या कंपनीच्या लोगोमध्ये दडलेत अनेक अर्थ
SHARES

प्रत्येक कंपनीचा स्वत:चा एक लोगो असतो. पुढे जाऊन हा लोगोच त्याची ओळख बनतो. कारण हाच लोगो कंपनीला रिप्रेझेंट करत असतो. या लोगोसाठी प्रत्येक कंपनी प्रचंड पैसा खर्च करतेपण या नावाजलेल्या लोगोचा अर्थ काय? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? प्रत्येक कंपनीच्या नावामध्ये त्याचा अर्थ लपलेला असतो. आज अशाच काही नावाजलेल्या ब्रँडच्या लोगोचा अर्थ आम्ही सांगणार आहोत


गुगल

गुगलचा वापर आपण सर्वच करतो. गुगलच्या या लोगोमागे देखील एक अर्थ आहे. गुगलच्या लोगोमध्ये ४ रंग आहेत. प्रत्येक अक्षर वेगवेगळ्या रंगात अधोरेखित केलं आहे. गुगलचा लोगो हे सांगण्याचा प्रयत्न करतो की, ते कधीही नियमांशी खेळत नाहीत किंवा त्याचं उल्लंघन करत नाही


) अॅमेझॉन

ऑनलाईन शॉपिंगसाठी अॅमेझॉनला ग्राहकांनी अधिक पसंती दिली आहे. अॅमेझॉन नेहमीच त्यांच्या ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहू इच्छिते. हेच त्यांच्या लोगोमध्ये देखील अधोरेखित करण्यात आलं आहे

अॅमेझॉनच्या नावाच्या खाली एक पिवळी रेषा दिसते. ही रेषा म्हणजे स्माईल आहे. ही रेषा ए या अक्षरापासून सुरू होते आणि झेड या अक्षरावर संपते. याचा अर्थ ए टू झेड इथं सर्व मिळतं.


बेंटले

बेंटले ही एक प्रसिद्ध ऑटोमेकर कंपनी आहे. ही कंपनी लक्झरी कार बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. बेंटलेच्या लोगोमध्ये मध्यभागी बेंटले याचा शब्दाचा 'बी' आहे. 'बी'च्या दोन बाजूला पंखे दाखवण्यात आली आहेत

याचा अर्थ असा की, ज्याप्रकारे पक्षी आकाशात उंच उडतो त्याप्रकारे ही कार वाऱ्याच्या वेगानं पळू शकते


मास्टरकार्ड


मास्टरकार्डच्या लोगोमध्ये दोन रंग आहेत. हे दोन रंग सुख-समृद्धी अधोरेखित करतात. लाल रंग उत्कटता, धैर्य आणि आनंद दर्शवतो. तर पिवळा रंग हा आशावाद, समृद्धता दर्शवतो


फोक्सवागेन


फोक्सवेगनच्या लोगोमध्ये व्हीचा अर्थ म्हणजे फोकस. जर्मन भाषेमध्ये याचा अर्थ होतो माणसे. तर याच लोगोत दडलेल्या डब्ल्यूचा अर्थ आहे वॅगन. वॅगन म्हणजे कार. लोकांसाठी बनलेली कार असा या पूर्ण लोगोचा अर्थ आहे.


6) मर्सिडिज बेंझ

मर्सिडिज बेंझच्या लोगोमध्ये तीन स्टार पाहायला मिळतात. हे तीन स्टार कंपनीच्या गुणवत्तेवरील वर्चस्व दर्शवतात


ऑडी


ऑडीच्या लोगोमध्ये चार वर्तुळ दर्शवले आहेत. १९३२ मध्ये ऑटो युनियन कंसोर्टियम संस्थेने ४ नवीन कंपन्यांची स्थापना केली होती. डीकेडब्ल्यू, हॉर्च, वाँडरर आणि ऑडी याच त्या चार कंपन्या होत्या. त्यापैकी प्रत्येक वर्तुळ हे या कंपन्यांना दर्शवतं.  


हेही वाचा-

१०० च्या नवीन नोटेवरील 'राणी की वाव'ची रंजक गोष्ट



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा