शेफ देवव्रत जातेगावकर साकारणार मार्जरीनची 'त्रिमूर्ती'

  Mumbai
  शेफ देवव्रत जातेगावकर साकारणार मार्जरीनची 'त्रिमूर्ती'
  मुंबई  -  

  मुंबई - प्रसिद्ध शेफ देवव्रत जातेगावकर लवकरच एका अद्भुत कलेचा नमुना आपल्यासमोर घेऊन येणार आहेत. सांताक्रुझ येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आवारात (अरायवलमध्ये) देवव्रत मार्जरीनची 'त्रिमूर्ती' साकारणार आहेत.

  भारतातील प्रसिद्ध लेण्यांची देणगी असलेल्या या 'त्रिमूर्ती' चे मार्जरीन शिल्प 8 बाय 7 उंचीचे असणार आहे. या भव्य शिल्पासाठी तब्बल 1300 ते 1500 किलो मार्जरीन वापरले जात आहे.

  14 फेब्रुवारीपासून या कामाला सुरुवात करण्यात आली असून 24 फेब्रुवारीला येणाऱ्या महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर ते पूर्ण केले जाणार आहे. त्यासाठी दिवसाचे 14 तास देवव्रत या काआर्व्हिंग कलाकारीसाठी या ठिकाणी व्यस्त असतील. विमानतळाच्या आवारात जनसमुदायांच्या समोर हे शिल्प साकारले जात असल्यामुळे त्याच्या सभोवताली काचेची चौकोनी भिंत उभारली जाणार आहे. जेणेकरून, हे भव्य शिल्प आकारास येताना प्रवाशांनाही ते पाहता येईल.

  'भारतीय संस्कृतीत 'त्रिमूर्ती'ला अढळ स्थान आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतिक या त्रिमूर्तीत आहे, जे निर्मिती, संगोपन आणि विनाश या जीवनातील महत्वाचे तीन पैलू स्पष्ट करतात, ज्या कधीच बदलत नाही, केवळ आपल्याच नव्हे तर जगातील इतर संस्कृतीला देखील या पैलू लागू होतात. जगात येणाऱ्या प्रत्येकाला या घटकांमधून जावंच लागतं, आपल्या भारतीय संस्कृतीचे हे मूळ असून याची महती जागतिक पातळीवर करून देण्याचा मानस असल्याचं देवव्रत यांनी सांगितलं. शिवाय काआर्व्हिंगची कला मला आंतरराष्ट्रीयस्तरावरदेखील जोपासायची असल्यामुळे, इतर कोणत्या शिल्पापेक्षा 'त्रिमूर्ती' रेखाटून भारतीय संस्कृतीचे प्रतिक लोकांसमोर सादर करणे मला योग्य वाटले.' येत्या २४ फेब्रुवारीला 'त्रिमूर्ती' चे तयार झालेले हे मार्जरीन शिल्प लोकांना मोफत पाहता येणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.