सोशल मीडियावर चीनी कमच

Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - ‘यूज अॅण्ड थ्रो’ या चीनी संकल्पनेनं भारतीय नागरिकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरूवात केली. अगदी दिवाळीला लागणारे कंदील, फटाकेही मेड इन चायना झाले. मात्र पाकिस्तानच्या मुद्यावरून चीनवर असंतोष व्यक्त केला जातोय आणि चीनला धडा शिकवण्यासाठी सोशल मीडियावर चिनी उत्पादनांविरोधात मोहिमच सुरू झाली.

चिनी वस्तू खरेदी करू नका, केवळ भारतीय वस्तू खरेदी करा, अशा आशयाचे मेसेज सोशल मिडीयावर फिरतायत आणि याचाच परिणाम नवीन पिढीवर झाला आहे.

सोशल मीडियावर चिनी दिव्यांच्या तुलनेत भारतीय दिवे सरस असल्याची माहिती दिली जातेय. भारतीय दिव्यांमध्ये विविधता बघून ग्राहकांनी चिनी दिव्यांकडे पाठ फिरवल्याचं पहायला मिळतय.

Loading Comments